किम जोंग-उनने ‘कोरोना’च्या रूग्णाला ठार केले ?; सोशल मीडियावर बातमी

सिंगापूर :- उत्तर कोरियात ‘कोरोना’च्या रूग्णाला ठार मारल्याचा दावा सोशल मिडीयावर करण्यात आला आहे. या बातमीची मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे. अनेकांनी ही बातमी शेअर केली आहे. पण, ती खरी आहे की नाही याचा पडताळा मिळालेला नाही.

असे होण्याचे दुसरे कारण असे की त्या बातमीत उत्तर कोरियाचा हुकूमशाह किम जोंग-उन याचे नाव आहे. किम जोंग-उन याने असे अतर्क्य आदेश दिले आहेत हे खरे असल्याने त्याच्या नावे अशा बऱ्याच काल्पनिक दंतकथाही चर्चेत येत असतात.

याबाबत एका वेबसाईटने दिलेल्या बातमीत म्हटले आहे की, उत्तर कोरियात कॉव्हीड याला कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले होते. तो कोरोनाचा उत्तर कोरियातील पहिला रुग्ण होता. देशात कोरोनाची साथ पसरू नये म्हणून किम जोंग-उन याने त्याला ठार मारण्याचा आदेश दिला.