निसर्गाने मारले अन् प्रशासनाने छळले, संतापलेल्या शेतकऱ्याने सोयाबीनची गंजीच पेटवली

Stubble Burning

यवतमाळ : निसर्गाने मारले अन् प्रशासनाने छळले… अशा दुहेरी संकटात सापडलेल्या एका शेतकऱ्याने चक्क सोयाबीनची गंजी पेटवून आपला संताप व्यक्त केला. मनिष जाधव असे या शेतकऱ्याचे नाव आहे.

यावर्षी यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी अस्मानी आणि सुलतानी संकटांनी ग्रस्त झाला आहे. सुरवातीला दुबार पेरणीला सामोरे जावे लागले. कशीबशी पैशाची जुळवाजुळव करून शेतकऱ्यांनी दुबार पेरणीही केली. शेतकऱ्यांना पदरी दोन पैसे पडतील, अशी आशाही निर्माण झाले होती. पण परतीच्या पावसाने पिकांचे मोठे नुकसान केले. उरल्यासुरल्या आशाही नष्ट झाल्यात. अशाच शेतकऱ्यांपैकी एक आहेत महागावचे मनीष जाधव. पावसाने उसंत घेतल्याने त्यांनी सोयाबीन सोंगणीस सुरवात केली. सोयाबीनच्या नुकसानीची कल्पना अधिकाऱ्यांना दिली असता सरकारी निकषात आपला तालुका बसत नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. संतप्त झालेल्या मनीष यांनी सरकारचा निषेध व्यक्त करीत आपल्या शेतातील सोयाबीन पेटवून दिले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

.