IPL २०२० KXIP vs MI: कीरोन पोलार्डने स्पष्ट केले आपल्या उत्कृष्ट फलंदाजीचे कारण

Kieron-Pollard.jpg

मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) अष्टपैलू किरोन पोलार्डने किंग्ज इलेव्हन (Kings XI Punjab) पंजाबविरुद्ध २० चेंडूत ३ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने ४७ धावांचे तुफानी डाव खेळला.

मुंबई इंडियन्सचा (MI) अष्टपैलू किरोन पोलार्ड किंग्ज इलेव्हन पंजाब (KXIP) विरुद्ध IPL सामन्यात हार्दिक पांड्यासह शेवटच्या २३ चेंडूत ६७ धावा केल्यावर म्हणाला की, शेवटच्या ४ षटकांत काहीही शक्य होते हे मला ठाऊक आहे. ‘सामनावीर’ पोलार्ड म्हणाला, ‘तुम्हाला परिस्थितीनुसार खेळावे लागेल. गोलंदाजांना पाहून प्रत्येक षटकात किती धावा करता येतील हे ठरवा. आज हार्दिक आला आणि त्याने आपली शक्ती दर्शविली. आम्हाला माहित आहे की शेवटच्या ४ षटकांत काहीही शक्य आहे.’

किंग्ज इलेव्हन पंजाबचा कर्णधार के.एल. राहुलने कबूल केले की आपल्याला अतिरिक्त गोलंदाज मैदानात उतरावे लागेल. तिसर्‍या पराभवानंतर तो म्हणाला की, ‘हा निराशाजनक पराभव आहे, पण निराश आहे असे मी म्हणणार नाही. आम्ही ४ पैकी तीन सामने जिंकू शकलो असतो. आम्ही या सामन्यात काही चुका केल्या. आशा आहे की पुढील सामन्यांमध्ये आम्ही जोरदार खेळू. दुसरा गोलंदाज किंवा अष्टपैलू खेळाडू आवश्यक आहे जो फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्ही करू शकतो. आम्ही प्रशिक्षकांसह एकत्र निर्णय घेऊ.’

मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा म्हणाला की, डेथ ओव्हर्समधील पंजाबच्या कमकुवत गोलंदाजीचा फायदा त्याच्या संघाने घेतला. तो म्हणाला की, “आम्ही चांगली सुरुवात करू शकलो नाही परंतु पंजाबच्या गोलंदाजीकडे पाहून आम्ही अंदाज केला की आपण मेकअप करू शकतो. पोलार्ड आणि हार्दिकने चांगली कामगिरी केली आणि त्यांना फॉर्ममध्ये पाहून चांगले वाटले.”

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER