ठाण्यातील १,३८८ हेक्टरवरील खारफुटीला ‘संरक्षित वना’चा दर्जा

reserved forest

मुंबई :- ठाणे जिल्ह्यातील खारफुटी (Mangrove) असलेले सुमारे १,३८८ हेक्टरचे क्षेत्र महाराष्ट्र सरकारने ‘संरक्षित वन’ (Reserved Forest) म्हणून जाहीर केले आहे. यासाठी १९२६ च्या भारतीय वन कायद्याच्या कलम ४ अन्वये आवश्यक असलेली अधिसूचना राज्य सरकारच्या वने आणि पर्यावरण मंत्रालआने राजपत्रात प्रसिद्ध केली आहे. अशा प्रकारे राज्यातील ‘संरक्षित वन’ म्हणून जाहीर केलेले राज्यातील क्षेत्र आता १६,७०० हेक्टर एवढे झाले आहे.

‘संरक्षित वन’ म्हणून जाहीर केलेली खारफुटी असलेल ही जमीन ठाणे (Thane) जिल्ह्याच्या ज्या १४ गावांमधील आहे त्यांत चेंदणी, मुंंब्रा, म्हातार्डी, सोनकर, दिवा, कोळशेत, बाळकुम, कळवा, पार्सिक, घोडबंदर, उत्तन, भाईंदर आणि मोरवा यांचा समावेश आहे.

याखेरीज  रायगड, सिंधूदुर्ग, ठाणे आणि मुंबई उपनगर या समुद्रकिनाºयावरील जिल्ह्यातील खारफुटीखालची आणखी १,५७५ हेक्टर जमीन, खारफुटीचे अधिक चांगल्या प्रकारे जतन व्हावे यासाठी वन कायद्याच्या कलम २० अन्वये वन विभागाकडे हस्तांतरित करण्याचेही राज्य सरकारने ठरविले आहे.

वन खात्याकडे हस्तांतरित केली जाणार असलेली ही खारफुटीची जमीन सिंधुदुर्ग जिल्ह्यात सावंतवाडी, वेंगुर्ला, कुडाळ, मालवण आणि देवगड तालुक्यांत, रायगड जिल्ह्याच्या श्रीवर्दन तालुक्यात,  मुंबई उपनगर जिल्हयात कांदिवली, एक्सर, दहिसर,  गोराई, वर्सोवा, बांद्रा आणि जुहू तर ठाणे जिल्ह्याच्या भिवंडी तालुक्यात ३२ गावांतील आहे.

अशा प्रकारे उच्च न्यायालयाने आदेश दिल्यानंतर सुमारे १५ वर्षांनंतर खारफुटीची जमीन वन विभागाकडे हस्तांतरित केली जात आहे. न्यायालयाने तसा मूळ अंतरिम आदेश सन २००५ मध्ये दिला होता व सन २०१८ मध्ये त्याचा पुनरुच्चार केला होता.  रायगड जिल्ह्यातील न्हावा-शेवा येथील जवाहरलाल पोर्ट ट्रस्टने मात्र त्यांच्या हद्दीतील १,१७७ हेक्ट खारफुटीजी जमीन अद्याप वन खात्याकडे सुपूर्द केलेली नाही. सरकारच्या या संथगती व निष्काळजी कारभारामुळे खारफुटींची कत्तल रोखणे कठीण होत आहे, अशी चिंता पर्यावरणवाद्यांनी व्यक्त केली आहे.

राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी यांनी यासंदर्भात असे टष्ट्वीट केले: आमच्या सरकारने एक वर्षाहूनही कमी वेळात खारफुटीची ६,५०० हेक्टर जमीन ‘संरक्षित वन’ म्हणून जाहीर केली आहे,हे सांगण्यास मला आनंद होत आहे. येत्या जूनपर्यंत हे क्षेत्र १० हजार हेक्टरपर्यंत वाढेल अशी अपेक्षा आहे.

ही बातमी पण वाचा : माध्यमांनी ‘मीडिया ट्रायल’ ऐवजी फक्त वस्तुनिष्ठ बातम्या द्याव्या

अजित गोगटे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER