सुपरस्टार रजनीकांतचही कुलदैवत आहे जेजूरीचा खंडोबा !

rajnikant

साऊथचा सुपरस्टार रजनीकांत (Rajinikanth) आपल्यासाठी  हिरो असला तरी साऊथच्या लोकांसाठी तो देवच. त्याला थलाईवा म्हणतात. त्याची मंदिरं आहेत. त्याची पुजा होते. करोडो चाहते त्याच्या एका झलेकसाठी जीव ओवाळून टाकतात. त्याच्या वाढदिवसादिवशी त्याच्या भल्यामोठ्या पोस्टर्सना दुधाची आंघोळ घातली जाते. वातावरण सगळं भक्तीमय.

महाराष्ट्राचं कुलदैवत म्हणजे मल्हारी मार्तंड जेजूरीचा खंडोबा. संपूर्ण महाराष्ट्राचं प्रेम व भक्ती आपल्या खंडोबावर आहे. खंडोबाच्या लोककथेतील संदर्भ असलेले अनेक लोकगीत आता मेनस्ट्रीममध्ये सुपरहिट होत आहेत. पाच राज्यातले भक्त जेजूरी गडाला येतात. मल्हारी मार्तंडाच्या चरणी पाय ठेवतात. नवस बोलतात. नव्या नवरीला त्यांचे पती उचलून पायऱ्या चढत देवाच्या गडावर नेतात. ती एक कमिटमेंट असते. संसाराचा भार ही असाच उचलीन अशी एक आशा असते.. पण विषय असा आहे की थलैव्वाचा आणि देव खंडोबाचं नेमंक कनेक्शन काय? हा तुम्हाला प्रश्न पडला असेल.

आजपासून शंभर वर्षापूर्वीची गोष्ट  आहे.  आपल्या कुटुंबाचं पोट भरावं म्हणून महाराष्ट्रातून एक कुटंब मजल दरमजल करत बंगळूरमध्ये पोहचलं. लेकराबाळांना सांभाळले. पुढं त्यांचा मुलगा मोठा झाला. त्याने काबाड कष्ट केले. कुटुंबाला सांभाळलं. अशातच १२ डिसेंबर १९५० ला रामोजीराव गायकवाड आणि जीजाबाई गायकवाडांच्या कुटुबांत मुलानं जन्म घेतला. त्याचं नाव ठेवण्यात आलं शिवाजीराव. बंगळूरूत राहूनही महाराष्ट्राच्या युगपूरषाचं नाव त्यांनी आपल्या मुलाला दिलं. महाराष्ट्राशी त्यांची नाळ तुटली नाही याचेच ते उदाहरण होतं. पुढे स्वतः कष्टाच्या जोरावर तो रजनीकांत बनला आणि रजनीकांतचा थलईवा….

खंडोबा आणि रजनीकांतचं कनेक्शन

महाराष्ट्रातलं कडेपठार हे रजनीकांत यांच मुळ गाव. या गावातून त्यांचे आजोबा बंगळूरुला गेले आणि तिथले रहिवासी झाले. रजनीकांत यांचं कुलदैवतही महाराष्ट्रातच आहे.

महाराष्ट्रातील अनेकांचे आराध्य दैवत आणि कुलदैवत असलेला जेजुरीचा खंडोबा हे रजनीकांतचे कुलदैवत आहे. एका खासगी मुलाखतीत स्वत: रजनीकांत यांनी याविषयी उल्लेख केला होता. दरम्यान, कामाच्या व्यापात एवढ्या लांब जेजुरीला खंडोबाच्या दर्शनासाठी जाणं जमत नसल्याची खंतही त्यांनी मुलाखतीमध्ये व्यक्त केली होती.

संघर्षाला दिले आहे तोंड

भारतीय चित्रपटसृष्टीमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केलेल्या रजनीकांत अर्थात शिवाजीराव गायकवाड, आज दाक्षिणात्य सिनेमातील ‘थलईवा’ म्हणजेच परमेश्वर झाले आहेत. मात्र, शिवाजी ते रजनीकांत बनण्यापर्यंतचा त्यांचा प्रवास खूप मोठा आणि कष्टाने भरलेला होता.

रजनीकांत यांचे नाव छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरुन ठेवले गेले. वडील रामोजीराव गायकवाड पोलीस कॉन्स्टेबल होते. तर आई जीजाबाई गृहिणी होत्या. बंगळुरुमध्ये जन्म झाला असला तरी रजनीकांत यांच्या घरी मराठी भाषा बोलली जायची तर घराबाहेर कन्नड भाषा बोलली जात होती. आता प्रश्न असा पडतो की, मराठी कुटुंब बंगळुरुमध्ये कसे काय?.

रजनीकांत घरातील सगळ्यात लहान. त्यांना २ मोठे भाऊ आणि १ बहीण. वडिलांच्या निवृत्तीनंतर सगळे कुटुंब बंगळुरुमध्ये राहण्यासाठी आले. पण त्याचवेळी त्यांच्या आईचा मृत्यू झाला. त्यावेळी रजनीकांत अवघ्या ९ वर्षांचे होते. त्यामुळे साहजिकच अनेक भावंडांची जबाबादारी त्यांच्यावर येऊन पडली.

अशी मिळाली पहिली संधी

रजनीकांत यांचे प्राथमिक शिक्षण कन्नड शाळेत झाले. शाळेत असताना त्यांना क्रिकेट, फुटबॉल आणि बास्केटबॉलची विशेष आवड होती. त्यांच्या भावाने त्यांना रामकृष्णमिशनच्या शाळेत घातल्यानंतर त्यांना त्या ठिकाणी अध्यात्माची आवड जडली. वेद,शास्त्रे, पुराणे यांचा अभ्यास त्यांना केला. मठात अनेक सांस्कृतिक कार्यक्रम होत असत. एकदा त्यांना महाभारतावरील आधारीत नाटकात एकलव्याचे काम करण्याची संधी मिळाली.तिथनं त्यांनी मागं वळून पाहिलं नाही. एकानंतर एक सुपरहिट चित्रपटात त्यांनी काम केलंय. बाशा, अण्णा मलाई, रंगा, कबाली, काला असे कितीतरी सुपरहिट सिनेमे त्यांनी दिले. पण रजनीकांतचं हे खंडोबा कनेक्शन मात्र महाराष्ट्रासाठी अजून सुपरहीट आहे.

Disclaimer:-‘संपादकीय’ लिहिणारे हे ज्येष्ठ पत्रकार असून त्यांचे स्वतंत्र मत आहे. त्यांच्या लेखासोबत ‘महाराष्ट्र टुडे’चा कसलाही संबंध नाही. आम्ही केवळ त्यांचे मत मांडण्याचा प्रयत्न आमच्या माध्यमातून करत आहोत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER