खंडोबा केवळ महाराष्ट्राचा नाही तर संपूर्ण भारताचं दैवत

Khandoba

संपूर्ण महाराष्ट्राचं कुलदैवत म्हणून आपल्या सर्वांना खंडोबा परिचयाचा आहे. पण ही ओळख खंडेरायाचा महिमा आणि त्याच्या भक्तीची व्याप्ती संकोचीत करणारी आहे. खंडोबाची मंदीर आणि भक्त संपूर्ण भारतात आढळतात. देशभरात खंडोबाचे उपासक आहेत. उत्तर भारतात खंडोबाचा जितका प्रभाव आहेत तितकात दक्षिण भारतात त्याचे भक्तगण आहेत.

यळकोट यळकोट जय मल्हार, सदानंदाचा येळकोटच्या गजरात तल्लीनतेनं खंडोबाची भक्ती केली जाते. त्याचीच काही उदाहरणं आपण पाहणार आहोत.देशभरातील प्रमुख धर्मग्रंथामध्ये देखील खंडोबाचा उल्लेख केल्याची अनेक उदाहरणं पहायला मिळतात.

खंडोबा होता भगवान श्रीकृष्णाचा कुलदैवत

शंकराने खंडोबाच्या रुपात त्रेतायुगात अवतार घेवून मणी- मल्ल असूरांचा नायनाट केला. वाईट शक्तींचा पराभव केला. खंडोबाप्रमाणेच राक्षसांचा पराभव करणाऱ्या श्रीकृष्णाचा खंडोबा कुलदैवत होता असा उल्लेख नामदेवगाथेत आणि श्रीधरस्वामी नाझरेकरांच्या हरविजय पुरणपोथीत आढळतो. तसेच अनेक लोककथा, लोकगीत इतर धर्मग्रंथात खंडोबा श्रीकृष्णाचा कुलदैवत असल्याचे लिहलं आहे.

महाभारत हे महाकाव्य लिहणाऱ्या व्यासांनी खंडोबा उपासनेतला महत्त्वाचा मल्लारिमहात्म्यम् हा ग्रंथ लिहला

खंडोबा उपासनेतला प्रमुख महत्त्वाचा मानला जाणारा आद्यसंस्कृत ग्रंथ मल्लारिमहात्म्यम् हा ग्रंथ आहे. खंडोबाच्या एकूण महात्म्याची त्याने केलेल्या युद्धांची, दानवांच्या पराभवाची, महात्म्याची थोरवी सांगणारा हा ग्रंथ. या ग्रंथात खंडेबा अवताराचे प्रयोजन आणि महात्म्यकथा सांगण्यात आलीये.

सातवहनाच्या काळात खंडोबा महाराष्ट्राचं कुलदैवत असल्याची इतिसाहासने घेतलीये नोंद

सातवहनाच्या काळात म्हणजे इ.स. पुर्व २२० ते २२६ पुर्वी महाराष्ट्रामध्ये सातवाहनांचा

बालाजी पुराणम् या तुळु ग्रंथात आढळतो खंडोबाचा उल्लेख

खंडोबा हे दैवत केवळ महाराष्ट्रापुरते मर्यादीत नसून संपूर्ण भारताचे ते दैवत असल्याचे अनेक पुरावे सापडतात. उत्तर भारतातील आणि दक्षिण भारतातील महर्षींनी लिहलेल्या प्रमुख धर्मग्रंथात आढळणारा खंडोबाचा उल्लेख हे विधान सिद्ध करतो. तुळु भाषेतील बालाजीपुराणम् या धर्मग्रंथात खंडोबा देवाचा इतर देवतांशी खंडोबाच नात काय होत याबद्दल लिहलं आहे.

महानुभाव पंथाच्या लीळाचरित्रात खंडोबाचा उल्लेख

यादवकाळातील महानुभावांच्या लीळाचरित्रात म्हाईंभटांनी लिहलेत्या आद्यचरित्र ग्रंथामध्ये चौदाव्या शतकात संपूर्ण भारतभर खंडोबाच्या उपासनेचा झालेला प्रचार आणि प्रसाराबद्दल लिहलं आहे.

आद्यशंकरचार्यांशी तीन ब्राम्हण खंडोबा भक्तांचा बौधिक वाद

हिंदू धर्म उपासकात सर्वाधिक ज्ञानी मानल्या जाणाऱ्या आद्यशंकराचार्यांशी तीन ब्राम्हण मल्हारीभक्तांचा कर्नाटकातील मैलार तर्थक्षेत्री बौधिक वाद झाल्याचा उल्लेख शंकरविजये या आनंदगिरींच्या ग्रंथात आढळतो. कर्नाटकातील त्यावेळचे थोर समाजसुधारक संत बसवेश्वर यांच्या वचन साहित्यात देखील या बौधिक वादाची नोंद आहे.

Disclaimer:-‘संपादकीय’ लिहिणारे हे ज्येष्ठ पत्रकार असून त्यांचे स्वतंत्र मत आहे. त्यांच्या लेखासोबत ‘महाराष्ट्र टुडे’चा कसलाही संबंध नाही. आम्ही केवळ त्यांचे मत मांडण्याचा प्रयत्न आमच्या माध्यमातून करत आहोत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER