एक खानापूर गाव म्हणजे चंद्रकांत पाटील नाही ; महाराष्ट्र म्हणजे चंद्रकांत पाटील

Chandrakant patil

कोल्हापूर :- भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांचे मुळगाव असलेल्या कोल्हापुरातील खानापूर ग्रामपंचायत शिवसेनेने जिंकली. यावर प्रतिक्रिया देताना आमदार चंद्रकांत पाटील म्हणाले की, एक खानापूर गाव म्हणजे चंद्रकांत पाटील नाही. खानापूरमध्ये सहा पैकी तीन जागा आम्ही जिंकल्या आहेत. दोन जागांवर कमी मताने आम्ही पराभूत झालो, पण गावाने दिलेला कौल मान्य आहे. एक खानापूर गाव म्हणजे चंद्रकांत पाटील नाही. महाराष्ट्र म्हणजे चंद्रकांत पाटील आहे.

ग्रामपंचायत निवडणुकीत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना त्यांच्याच मुळ गावात शिवसेनेने धक्का दिला आहे. खानापूर गावात पहिल्या ६ जागांवर शिवसेनेने बाजी मारली आहे. इथे आमदार प्रकाश आबिटकर यांचे पॅनेल निवडून आले आहे. राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस महाआघाडीचे सरकार असले, तरी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या खानापूर गावात मात्र हा फार्म्युला बाजूला ठेवला गेला. शिवसेनेला रोखण्यासाठी भाजपने राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेसची साथ घेतली होती.

ही बातमी पण वाचा : चंद्रकांत पाटलांना सर्वात मोठा धक्का, पाटलांच्या गावातील सत्ता शिवसेनेने हिसकावली

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER