चंद्रकांत खैरेंनी केला खासदारांच्या खुर्चीवर कब्जा; मुख्यमंत्र्यांसमोरच गोंधळ

khaire-and-jaleel-fight-each-other-in-front-of-cm-uddhav-in-aurangabad

औरंगाबाद : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे औरंगाबादच्या दोन दिवसीय दौऱ्यावर आहेत. यापार्श्वभूमीवर त्यांनी विभागीय जिल्हावार बैठका घेतल्या. या बैठकीला एमआयएम चे खासदार इम्तियाज जलील आणि सेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे दोघेही उपस्थित होते.

खासदार इम्तियाज जलिल आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्यात खुर्ची नाट्य पहायला मिळालं. खैरे हे समोरच्या खुर्चीवर बसल्यानं जलिल यांना बसण्यासाठी करसत करावी लागली. दरम्यान, जलिल यांनी या खुर्ची नाट्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

औरंगाबादमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आढावा बैठकीचं आयोजन केलं होतं. उद्धव ठाकरे यांच्या बाजुच्या खुर्चीवर पर्यावरण आदित्य ठाकरे हे बसले होते. त्यांच्या बाजूच्या खुर्चीवर इम्तियाज जलिल बसणार होते. परंचु त्या खुर्चीवर अचानक खैरे येऊन बसले. प्रोटोकॉलनुसार या जागा निश्चित करण्यात आल्या होत्या.