‘ईडी’ने नोटीस बजावल्याने खडसे समर्थक आक्रमक, घोषणाबाजी करत ईडीचा निषेध

NCP ED Protest

जळगाव : राष्ट्रवादी (NCP) नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांना ईडीची (ED) नोटीस मिळाल्यामुळे त्यांचे समर्थक आक्रमक झाले आहेत. जळगावमध्ये त्यांच्या समर्थकांनी ईडीविरोधात घोषणाबाजी केली. भाजपकडून (BJP) सूडाचे राजकारण केले जात असून, खडसेंना आलेली ईडीची नोटीस हा त्यातलाच एक भाग आहे, असा आरोप करत जळगाव जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी रविवारी दुपारी पक्ष कार्यालयात केंद्र सरकारच्या विरोधात निदर्शने केली.

भोसरीतील एमआयडीसीतील भूखंडाच्या व्यवहारप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने एकनाथ खडसे यांना चौकशीची नोटीस बजावली आहे. 30 डिसेंबर रोजी त्यांना मुंबईतील कार्यालयात चौकशीकामी उपस्थित रहावे लागणार आहे. ही बाब स्वतः खडसेंनी काल (शनिवारी) पत्रकारांशी बोलताना सांगितली. यानंतर आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी पक्ष कार्यालयात एकत्र येत भाजप विरोधात जोरदार घोषणाबाजी करत निदर्शने केली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस महानगराध्यक्ष अभिषेक पाटील, युवती काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा कल्पिता पाटील, माजी नगरसेवक अशोक लाडवंजारी, सुनील माळी, वाल्मीक पाटील, प्रदीप भोळे, अजय बढे आदी उपस्थित होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER