अटकेसाठी संरक्षण मागणारी खडसेंची याचिका निराधार – ईडी

Maharashtra Today

मुंबई :- भोसरी जमीन घोटाळाप्रकरणी (Bhosari land scam case) एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांची ईडी चौकशी सुरू आहे. ईडीने ऑक्टोबर महिन्यात खडसेंविरोधात ईसीआयआर दाखल केल्याने खडसेंनी या प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करत अटकेपासून दिलासा देण्याची मागणी करत हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. याच्या उत्तरात ईडीने न्यायालयाला सांगितले की, ही याचिका निराधार आहे.

एकनाथ खडसेंचे वकील अ‌ॅड आबाद पोंडा यांनी न्यायालयाला सांगितले की, “एकनाथ खडसे आजारी आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ईडीने हा ईसीआयआर पीएमएलए कायद्यांतर्गत दाखल केला आहे. खडसेंनी समन्सला उत्तर दिले नाही तर ईडी त्यांना अटक करेल. खडसे यांना अटक करणार नाही, अशी हमी ईडी देत असेल तर आम्ही याचिका मागे घेऊ.

यावर ईडीतर्फे सॉलिसिटर जनरल अनिल सिंग यांनी न्यायालयाला सांगितले की, याचिकाकर्त्यांच्या दाव्यात काही तथ्य नाही. ही याचिका निराधार आहे. या रिपोर्टमध्ये खडसेंना आरोपी म्हटलेले नाही. एखाद्या व्यक्तीविरोधात ईसीआयआर (इन्फोरसमेंट केस इन्फॉर्मेशन रिपोर्ट) दाखल केला म्हणून तो गुन्हेगार होत नाही. ईसीआयआर केवळ अंमलबजावणी संचालनालयाच्या कार्यालयीन कामकाजाच्या अंतर्गत येणारी कागदपत्रे आहेत. या याचिकांवरची पुढील सुनावणी २८ जानेवारीला होणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER