‘खडसेंच्या पक्षप्रवेशानं राष्ट्रवादी काँग्रेसला निश्चितच नवे बळ, ऊर्जा मिळाली’ – अजित पवार

Ajit Pawar - Eknath Khadse

मुंबई : भाजपाला (BJP) रामराम ठोकून ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी आज राष्ट्रवादी कॉंग्रेस (NCP) पक्षात प्रवेश केला. एकनाथ खडसे यांच्यासह त्यांची कन्या रोहिणी खडसे (Rohini Khadse) आणि पत्नी मंदाकिनी यांनी देखील आज हातावर घड्याळ बांधलं आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत खडसे यांचा पक्षप्रवेश झाला. या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे सर्वच नेते उपस्थित होते. मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) हे आजच्या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमाला उपस्थित नव्हते. सामाजिक सुरक्षिततेच्या कारणास्तव गृहविलगीकरणात असल्याचं सांगण्यात येत आहे.ते ‘देवगिरी’ या त्यांच्या शासकीय निवासस्थानातून त्यांचं कार्यालयीन कामकाज नियमित सुरू आहे, अशी माहिती आज उपमुख्यमंत्री कार्यालयानं दिली.

दरम्यान, अजित पवार तानी खडसे यांच्या पक्ष प्रवेशावर फेसबुक पोस्ट च्या माध्यमातून प्रतिक्रिया दिली आहे. पवार आपल्या फेसबुक पोस्ट मध्ये म्हणतात,एकनाथरावजी खडसे साहेबांचे मी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षामध्ये मनापासून स्वागत करतो. खडसेसाहेब आणि रोहिणीताईंच्या पक्षप्रवेशानं राष्ट्रवादी काँग्रेसला निश्चितच नवे बळ, ऊर्जा मिळाली आहे. खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्रात पक्षवाढीसाठी त्यांच्या नेतृत्वाचा निश्चितच उपयोग होईल. खडसेसाहेब, रोहिणीताई खडसे, त्यांच्यासह पक्षप्रवेश केलेल्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांचे पक्षामध्ये हार्दिक स्वागत! पक्षात आपल्या ज्येष्ठत्वाचा, अनुभवाचा निश्चित सन्मान होईल, असा विश्वास देतो.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER