खडसेंची गाडी सुसाट! ज्या ज्या ठिकाणी बळ, त्या त्या ठिकाणी स्वतंत्र गट स्थापन करण्याचा नाथाभाऊंचा निश्चय

Eknath Khadse

मुंबई : गेल्या 40 वर्षांची साथ सोडून एकनाथ खडसे यांनी अखेर काल राष्ट्रवादीचा झेंडा हाती घेतला. राष्ट्रवादीत अधिकृत प्रवेश केला. चार वर्षांपासून आपण घरात शांत बसून होतो हा निर्णय घेतला नसता तर, पुढेही घरातच बसावं लागलं असतं. अशी खंत काल खडसेंनी प्रवेशानंतरच्या भाषणातून व्यक्त केली. त्यानंतर आता खडसे यांनी पुढची राजकीय रणनीती आखली आहे. यावरून आता खडसेंची गाडी सुसाट धावणार असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी राज्यभरात ज्या ज्या ठिकाणी खडसे समर्थकांचं बळ आहे त्या त्या ठिकाणी भाजपच्या बाहेर राहून कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचा स्वतंत्र गट करणार असल्याचं सांगितलं आहे. त्यामुळे आगामी काळात जळगाव जिल्हा परिषदेसह काही महानगरपालिकांमध्ये बंडखोरीची शक्यता आहे. यावेळी खडसेंनी हा स्वतंत्र गट राष्ट्रवादी काँग्रेससोबत बाहेरुन राहिल, असंही नमूद केलं आहे.

एकनाथ खडसे म्हणाले, “ज्या ज्या ठिकाणी आमचं बळ आहे त्या त्या ठिकाणी स्वतंत्र गट स्थापन करण्याची शक्यता आहे. स्वतंत्र ताकद उभी करुन भाजपच्या बाहेर राहतील आणि राष्ट्रावादीसोबत येतील. अशी शक्यता असलेल्या काही महापालिका आहेत, काही नगरपालिका आहेत. या ठिकाणी पक्षांतर कायद्याची बाधा न येता स्वतंत्र गट स्थापन करणे शक्य होणार असेल तर अनेकांनी त्याची तयारी माझ्याकडे दाखवली आहे. नगरसेवकांची तयारी असेल तर जळगाव जिल्हा परिषद असेल, महानगरपालिका असेल अशा ठिकाणी हा प्रयोग पुढील कालखंडात करु असे खडसेंनी सांगितले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER