खडसेंनी पक्ष सोडताना देवेंद्र फडणवीसांना व्हिलन ठरवण्याचा जो केविलवाणा प्रयत्न केला तो आता थांबवावा

Pravin Darekar & Eknath Khadse

मुंबई : एकनाथ खडसेंनी (Eknath Khadse) पक्ष सोडताना देवेंद्र फडणवीसांना (Devendra Fadnavis) व्हिलन ठरवण्याचा केविलवाणा प्रयत्न त्यांनी केला. मात्र, आता त्यांनी हे थांबवावे, असा हल्ला भाजप (BJP) नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण (Praveen Darekar) दरेकर यांनी केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणाऱ्या एकनाथ खडसेंनी देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दलचा पोटशूळ आणि तिरस्कार कमी करावा, असेही दरेकर म्हणाले.

प्रवीण दरेकर यांनी मराठा आरक्षणावरूनही खडसेंना टोला लगावला आहे. देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना ओबीसींना प्राधान्य देण्याचे काम झाल्याचे महाराष्ट्राने पाहिले आहे. ओबीसींबद्दल भाजपची भूमिका राज्यातील सर्वांना माहिती आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) ओबीसी समाजाचे आहेत. त्यामुळे ओबीसी म्हणजे खडसे नव्हेत. ओबीसी समाजातील अनेक लोकांना सत्तेतील आणि पक्षातील सन्मानाची पदे दिली गेली आहेत, त्याचा विसर खडसेंना पडला असावा, असा टोला दरेकर यांनी लगावला.

एवढेच नाही तर, दरेकर म्हणाले, देवेंद्र फडणवीस यांना टारगेट करण्याचे आणि टीका करण्याचे काम एकनाथ खडसेंना दिले गेले असावे. राज्यात अनेक प्रश्न आहेत. त्या प्रश्नांवर लक्ष घालून ते सोडवण्याचा प्रयत्न एकनाथ खडसेंनी करावा, असा सल्ला दरेकर यांनी दिला.

ही बातमी पण वाचा : भाजपला ताकद दाखवून देतो; उत्तर महाराष्ट्रात आता फक्त राष्ट्रवादी – एकनाथ खडसे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER