खडसे यांच्यामुळे महाविकास आघाडीची ताकद वाढणार : शंभूराज देसाई

शंभूराज देसाई

कोल्हापूर : गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) हे आज कोल्हापूर दौऱ्यावर होते. त्यांंनी अंबाबाई आणि जोतीबा मंदिर परिसरातील सुरक्षेचा आढावा घेतला. अंबाबाईचे मुख दर्शन घेतल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, भाजपमधून राष्ट्रवादीमध्ये आलेल्या एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्यामुळे महाविकास आघाडीची ताकद वाढेल. खडसे यांचे आम्हीसर्व सदस्य स्वागत करत आहोत.

गृराज्यमंत्री शंभुराज देसाई हे आज श्री क्षेत्र जोतिबा डोंगरावर जागर सोहळा असल्यामुळे दख्खनचा राजा श्री जोतिबा देवाच्या दर्शनासाठी आले पण कोरोना संसर्गामुळे १५ मार्च पासून मंदिर बंद असल्यामुळे त्यांनी दरवाजातूनच जोतिबा देवाचे मुखदर्शन घेऊन ते मंदिराच्या दारातूनच माघारी परतले . तप्पूर्वी ना. देसाई यांनी अंबाबाई मंदिराचे बाहेरूनच मुखदर्शन घेतले.

मंत्री श्री देसाई हे दर वर्षी तीन चार वेळा दर्शनासाठी येतात. त्यांचा कुलस्वामी जोतिबा आहे. ते जोतिबा देवाची निस्सिम भक्त आहेत. त्यांनी आज पर्यंतच्या इतिहासात चैत्र यात्रा कधीच चुकविलेली नाही. दरम्यान, मुख्यमंत्री ठाकरे यांनी सोलापूर दौऱ्यावेळी तुळजाभवानीचे बाहेरुनच दर्शन घेतले. यापार्श्वभूमीवर ना. देसाई मंदिरात जातात काय? याबाबत माध्यमांत उत्सुकता होती. मात्र, कोरोना महामारीमुळे मंदिरं बंद असल्याने ना. देसाई यांनी मंदिरात जावून दर्शन घेणे टाळले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER