भाजपला सोडचिठ्ठी दिल्याचे खडसेंना राष्ट्रवादीकडून मोठे बक्षीस मिळणार; कृषी, जलसंपदा किंवा गृहनिर्माण?

Sharad Pawar and Eknath Khadse

मुंबई : अखेर एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये (NCP) प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना आता लवकरच ब्रेक मिळणार म्हणजेच नवरात्रीतील घटस्थापनेचा मुहूर्त खडसेंनी चुकवला असला तरी अष्टमीच्या महूर्तावर खडसे राष्ट्रवादीत प्रवेश करतील हे आता निश्चित झाले आहे.

गेल्या चार दशकापासून उत्तर महाराष्ट्रात आणि राज्यात भाजपच्या विस्तारात खडसेंचा मोठा वाटा राहिला आहे. गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) यांच्यासोबत त्यांनी भाजपच्या (BJP) वाढीमध्ये मोठं योगदान दिलं आहे. तेव्हा अशा मोठ्या नेत्याला पक्षात घेत असताना राष्ट्रवादी काँग्रेसकडून खडसेंना काय मिळणार, याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.

खडसे यांना गृहनिर्माण, जलसंपदा किंवा कृषी अशा मोठ्या खात्याची जबाबदारी मिळण्याची चर्चा आता जोर धरु लागली आहे. दरम्यान, गृहनिर्माण खातं सध्या जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) तर जलसंपदा खातं जयंत पाटील यांच्याकडे आहे. आव्हाड आणि पाटील हे दोघेही राष्ट्रवादीच्या पहिल्या फळीतील नेते आहेत. अशावेळी त्यांच्याकडून मोठ्या खात्याची जबाबदारी काढून ती भाजपमधून येणाऱ्या खडसेंना दिली जाणार का? असा प्रश्नही अनेकांना पडत आहे.

तर, कृषी खातं हे शिवसेनेच्या दादाजी भूसे यांच्याकडे आहे. त्यामुळं शिवसेना (Shiv Sena) आपल्या गोटातून कृषी सारखं जनतेशी जोडणारं खातं सोडणार का, हा मोठा प्रश्न आहे. यावर पर्याय म्हणून खडसेंनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर ठाकरे सरकारच्या (Thackeray Government) खात्यांमध्ये फेरबदलाचे संकेत व्यक्त होत आहेत. कृषी खातं राष्ट्रवादीकडे घेऊन शिवसेनेला राष्ट्रवादीच्या गोटातील एखादं खातं दिलं जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

एकूणच खडसेंसाठी मोठ्या नेत्यांना त्यांच्या पदाचा त्याग करावा लागण्याची शक्यता आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER