खडसेंना आमदार करणार पण…, खडसेंच्या राजकीय वाटचालीवर राष्ट्रवादीचे स्पष्टीकरण

Eknath Khadse - Jayant Patil

जळगाव :- भाजपला (BJP) सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) सहभागी झालेल्या एकनाथ खडसे यांच्या राजकीय वाटचालीबद्दल राष्ट्रवादीकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे. एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्या राजकीय भवितव्याबाबत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी आपलं मत व्यक्त केलं. खडसे यांना राष्ट्रवादीकडून विधानपरिषदेवर संधी देण्याचा आमचा विचार होता. राज्यपाल नियुक्त आमदारांच्या कोट्यातून त्यांच्या नावाची आम्ही शिफारसही केली होती. मात्र, राज्यपालांनी शिफारस केलेल्या नावांवर अद्याप निर्णय घेतला नाही. हा निर्णय लांबणीवर ठेवणे म्हणजे दुर्दैव असल्याची टीका करत, खडसे यांच्यापाठीमागे राष्ट्रवादी खंबीरपणे उभी असल्याचे जयंत पाटील म्हणाले.

यावेळी बोलताना त्यांनी खडसे यांचा राष्ट्रवादी प्रवेशावर स्पष्टीकरण दिले. तसेच भाजपमधील राजकारणावर बोट ठेवत त्यांनी भाजपवरही गंभीर आरोप केले. एकनाथ खडसे यांच्यावर भाजपत अन्याय झालेला होता. खडसेंना ज्या प्रकारे सापत्नक वागणूक देण्यात आली होती, ते महाराष्ट्राच्या बहुजन समाजाला पचनी पडले नाही. सत्ता आल्यावर भारतीय जनता पक्षाचे लोक बहुजन लोकांना बाजूला सारतात. भारतीय जनता पार्टीने हे पुन्हा सिद्ध केले आहे. दिवंगत भाजप नेते गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) असो एकनाथ खडसे किंवा भाजपचे माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, ही त्याची उदाहरणं आहेत. जेव्हा गरज असेल तेव्हाच भारतीय जनता पार्टी बहुजनांना पायघड्या घालतात. नंतर त्याकडे दुर्लक्ष करतात. जेवा काम संपले तेव्हा बहुजनांना बाजूला करतात,” अशी घणघाती टीका जयंत पाटील यांनी केली. तसेच, भाजपच्या याच स्वभावामुळे खडसे यांच्या पावलावर पाऊल ठेवून अनेक बहुजन भाजपपासून दूर चालले आहेत, असा दावाही त्यांनी केला.

एकनाथ खडसे यांना ईडीची नोटीस मिळालेली असून जमीन खरेदीबाबत त्यांची चौकशी सुरु आहे. यावर बोलताना खडसे यांच्यावरील सर्व आरोप चुकीचे असून राष्ट्रवादी त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहील असे जयंत पाटील यांनी सांगितलं. ईडीची प्रथा आणि परंपरा बघितली तर भाजपच्या विरोधात जे जातील त्यांच्या मागे ईडीचा ससेमिरा लावला जातो. बऱ्याच नेत्यांच्या बाबतीत असे झाले. खडसे यांच्या मागे ईडी लागली त्यात आश्चर्य वाटण्याचं कारण नाही. खडसेंवरील आरोपांत काही तथ्य नाही. त्यांच्यावर करण्यात आलेले आरोप हे खोटे आहेत. खडसेंना ईडीची चौकशी लावून त्यांना नाहक त्रास देण्यात आला. तरीसुद्धा राष्ट्रवादी खडसे पक्ष यांच्या पाठीमागे उभा राहिला, असे जयंत पाटील म्हणाले.

ही बातमी पण वाचा : जेवढे मला छळाल, तेवढा तुमच्या बरोबरचा वर्ग तुम्हाला सोडून राष्ट्रवादीमध्ये येईल – एकनाथ खडसे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER