खडसेंनी माझा अतोनात छळ केला, पुन्हा नाव घेतल्यास याद राखा – अंजली दमानिया

Eknath Khadse.jpg

मुंबई : माझा लढा हा केवळ भ्रष्टाचाराविरोधात होता. कोणत्याही एका व्यक्तिविरोधात नव्हता. मी नितीन गडकरी आणि छगन भुजबळ यांच्याविरोधातही लढा दिलेला आहे. मात्र एकनाथ खडसे यांनी जेवढा माझा छळ केला, तेवढा कोणीही केलेला नाही, असं सांगतानाच यापुढे कोणत्याही पत्रकार परिषदेत माझं नाव घेतलं तर याद राखा, तुम्हाला सोडणार नाही, असा इशारा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी एकनाथ खडसेंना दिला.

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आज पत्रकार परिषद घेऊन भाजप नेते एकनाथ खडसे यांच्या दाव्याचं खंडन करतानाच खडसे यांच्याविरोधील विनयभंगाचा खटला संपलेला नसल्याचं स्पष्ट केलं. आरोपपत्रच अजून दाखल झालेलं नाही तर खटला संपला कसा? असा सवाल करतानाच खडसे याबाबत धांदात खोटं बोलत आहेत. एकनाथ खडसे हे जळगावमध्ये पत्रकार परिषदेत धांदात खोटे बोलले होते. खडसे माझ्याविरोधात अत्यंत खालच्या भाषेत बोलले होते, तुम्हाला जिथे जायचे तिथे जा, पण तुम्हाला मी सोडणार नाही.

एकनाथ खडसे, देवेंद्र फडणवीस, भाजप किंवा राष्ट्रवादी यांच्या राजकारणाबद्दल मला काहीही घेणे देणे नाही. खडसे हे खुनशी प्रवृत्तीने नेते आहे. ३ सप्टेंबर रोजी वाढदिवसाच्या दिवशी झालेल्या सभेत माझ्याबद्दल अश्लिल वक्तव्य केले होते. त्याचे व्हिडिओ आणि ऑडिओ हे माझ्याकडे आले. त्याचे हे व्हिडिओ मी वाकोला पोलीस स्टेशनमध्ये घेऊन गेले होते. त्यावेळी पोलिसांनी ५०१ कलमाखाली गुन्हा दाखल केला होता. ते अत्यंत खालच्या स्तराला जाऊन बोलले होते, असा दावाही दमानिया यांनी केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER