खडसे ईडीच्या चौकशीसाठी उद्या हजर राहणार ?

Eknath khadse

मुंबई :- राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांना भोसरी भूखंड खरेदी घोटाळा प्रकरणात उद्या (१५ जानेवारी) रोजी ईडी (सक्तवसुली संचलनालया)कडून चौकशीसाठीची तारीख मिळाली आहे.

या संदर्भात उल्लेखनीय आहे की, एकनाथ खडसे यांना या प्रकरणी आधीही नोटीस बजावण्यात आली आहे. त्यानंतर कोरोनाची लागण झाल्याने खडसे क्वारंटाईन होते. यानंतर त्यांनी ईडीकडून काही दिवसांचा अवधी मागितला होता. त्यानंतर आता खडसे उद्या चौकशीसाठी हजर राहणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (Eknath Khadse ED inquiry at Friday)

एकनाथ खडसे यांना ३० डिसेंबर २०२० ला ईडी कार्यालयात हजर व्हायचे होते. जळगावात असताना खडसेंना कोरोनाची सौम्य लक्षणे लक्षात आली. लक्षणे जाणवताच ते मुंबईला गेलेत. मुंबई येथील निवासस्थानी २८ आणि २९ डिसेंबर हे दोन दिवस त्यांनी आराम केला. कोरोनाची चाचणी केली होती. त्यांचा कोरोना रिपोर्ट ‘पॉझिटिव्ह’ आला होता. यानंतर खडसेंनी ईडीकडे चौकशीला हजर राहण्यासाठी १४ दिवसांचा कालावधी मागितला होता. त्यानुसार उद्या एकनाथ खडसेंना चौकशीसाठी ईडी कार्यालयात हजर व्हायचे आहे.

यापूर्वी अनेकदा माझी चौकशी झाली – एकनाथ खडसे

दरम्यान या संदर्भात खडसे पत्रपरिषदेत म्हणालेत की, यापूर्वी अनेकदा माझी चौकशी केली आहे. त्यावेळी मी हजर राहिलो. त्यांनी माझ्याकडे जे कागदपत्र मागितले, ते दिलेत. याही वेळेस ईडी जे काही कागदपत्र मागे ते देईन; सहकार्य करेन.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER