खडसेंकडून राजीनाम्याचा इन्कार, मात्र गुरुवारी पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश?

Sharad Pawar-Eknath Khadse-NCP

जळगाव : भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार अशी जोरदार चर्चा सुरू होती. तसेच त्यांनी भाजप सोडल्याचा आणि राजीनामादिला असल्याची चर्चा काल दिवसभर जळगावात सुरू होती. मात्र प्रसारमाध्यमांशी बोलताना खडसे यांनी राजीनामा दिला नसल्याचे स्पष्ट केले होते. परंतु असे असले तरी, येत्या गुरुवारी २२ रोजी खडसे यांचा मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रवेशाचा मुहूर्त निश्चित झाला असल्याचे त्यांचे कार्यकर्ते सांगत आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या उपस्थितीत खडसे १पोळ्या संपर्कातील १० ते १५ आमदार आणि कन्या रोहिणीसह राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची माहिती खडसेंचे विश्वासू कार्यकर्ते सांगत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, एकनाथ खडसे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याची मागील काही काळापासून चर्चा सुरू आहे. त्याबाबत अनेक मुहूर्त सांगण्यात आले. मात्र, हे मुहूर्त आपण दिले नसल्याचे सांगून खडसे यांनी स्पष्ट नकार दिला होता. आता त्यांच्याच निकटवर्तीयांनी गुरुवारी (ता.22) खडसे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याचे सांगितले आहे. त्यासाठी खडसेंचे विश्वासू कार्यकर्ते मुंबईला जाण्याच्या तयारीला लागले आहेत. तसे संदेश त्यांना मिळाले असल्याची माहितीही पुढे येत आहे.

खडसे यांनी भाजपच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याचे वृत्त वाऱ्यासारखे पसरले. मात्र, स्वत: खडसे यांनी त्याचा इन्कार करत मीडियावालेच माझ्या पक्षांतराचा मुहूर्त ठरवत असल्याचे सांगितले. रावेर येथील चार अल्पवयीन मुलांच्या हत्येची घटना शुक्रवारी घडली होती. रावेरमध्ये घडलेल्या हत्याकांडातील कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी गृहमंत्री अनिल देशमुख हे शनिवारी जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. तत्पूर्वी शासकीय विश्रामगृहात या खडसे यांनी देशमुखांची भेट घेतली. दोघांमध्ये बराच वेळ बंदद्वार चर्चा झाली होती. मात्र, खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाच्या चर्चेच्या पार्श्‍वभूमीवर त्यांनी गृहमंत्री देशमुख यांची भेट घेणे, याला विशेष महत्त्व प्राप्त झाले होते.

ही बातमी पण वाचा : शेतकऱ्यांशी चर्चा करताना पवारांच्या हातातील कवड्यांची माळ बरेच काही सांगून जाते…

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER