देवेंद्र फडणवीसांना कोरोना झाल्याचे कळताच खडसे म्हणाले …

Devendra Fadnavis and Eknath Khadse

नाशिक :- राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना कोरोनाची लागण झाली आहे. एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांना ही माहिती मिळताच त्यांनी फडणवीसांना ‘लवकर बरे व्हा’ अशा शुभेच्छा दिल्या आहेत.

ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर आज ते नाशिकमध्ये आहेत. नाशिक येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

यावेळी खडसेंनी सांगितले की, अनेक कार्यकर्ते भाजप सोडण्यास तयार आहेत. मात्र, सध्या पक्षांतरबंदी कायद्यामुळे त्यांना तिथेच राहावे लागेल. एवढेच नाही तर खडसे म्हणाले, ‘भाजपमधून कोणी सोडून जाऊ नये म्हणून राज्यातील महाविकास आघाडीचं सरकार पडण्याच्या अफवा पसरवल्या जातात. त्यात अजिबात तथ्य नाही. या अफवा सुरू असतानाच सरकारनं एक वर्ष पूर्णही केलं.’ असा टोलाही खडसेंनी यावेळी लगावला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER