अजित दादा नाराज नाहीत, सुप्रिया सुळे यांनी एकनाथ खडसेंची करवून दिली भेट

Ajit Paawr -Eknath Khadse-Supriya Sule

मुंबई : भाजपाला (BJP) सोडचिठ्ठी देऊन जेष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी अखेर शुक्रवारी शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. या पक्षप्रवेश सोहळ्याला राष्ट्रवादीतले सगळे दिग्गज नेते उपस्थित होते. मात्र अजित पवार या कार्यक्रमाला गैरहजर राहिले. त्यावरून काही माध्यमांनी राजकीय अर्थ काढत तर्कही लढवले, पण शरद पवार (Sharad Pawar) यांनीच व्यासपीठावरून अजित पवार यांच्या अनुपस्थितीबद्दल खुलासा केला. त्यानंतर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी नाथाभाऊंशी अजित पवारांची (Ajit Pawar) भेटच घालून दिली असल्याचा व्हिडीओ समोर आला आहे.

सुप्रिया सुळे, अजित पवार आणि एकनाथ खडसे यांची ही भेट प्रत्यक्ष नसली तरी व्हर्च्युअल होती. अजित पवार एकनाथ खडसे यांच्या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमाला आले नाहीत. म्हणजे ते नाराज आहेत, अशा बातम्या प्रसारमाध्यमांमध्ये झळकू लागल्या. मात्र पवार यांनी त्याबद्दल खुलासा केला. ‘अजित पवार हे नाराज असण्याचं काहीही कारण नाही. फक्त कोरोनाचं संकट असल्याने काळजी घ्यावी लागते, त्यामुळे ते घरी आहेतट, असं सांगत त्यांनी चर्चेला विराम जेण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर खुद्द सुप्रिया सुळे यांनी विडिओ कॉल लावून एकनाथ खडसे आणि अजितदादांमध्ये भेट घडवून आणली. त्यानंतर अजित पवारांनी आपल्या ट्‌विटमध्ये म्हटले आहे की, राज्याचे ज्येष्ठ नेते, एकनाथ खडसे यांचे मी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षामध्ये मनापासून स्वागत करतो. खडसेसाहेब आणि रोहिणीताईंच्या पक्षप्रवेशाने राष्ट्रवादी कॉंग्रेसला निश्‍चितच नवे बळ, ऊर्जा मिळाली आहे.

सध्या त्यांचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे.

ही बातमी पण वाचा :

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER