खडसे भ्रष्टाचारी, त्यांना आमदार करू नका; अंजली दमानिया यांची राज्यपालांना विनंती

Eknath-Khadse-Anjali-Damania

मुंबई : एकनाथ खडसे (Eknath Khadse)भ्रष्टाचारी आहेत; त्यांना आमदार करू नका, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया ( Anjali Damania) यांनी राज्यपालांना केली आहे. यामुळे खडसे यांची विधानपरिषदेची आमदारकीची संधी धोक्यात येण्याची शक्यता आहे.

खडसेंनी त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी माझ्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केले, असा आरोप अंजली दमानिया यांनी केला व याप्रकरणी वाकोला पोलीस ठाण्यात खडसेंविरूद्ध तक्रार दाखल केली आहे, असे सांगितले.

भाजपा सोडून एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यानंतर त्यांची राष्ट्रवादीतर्फे राज्यपाल नामनिर्देशित आमदार म्हणून विधान परिषदेवर वर्णी लागण्याची चर्चा आहे. त्यांचे नाव आमदारकीसाठी निश्चित मानले जात आहे. मात्र, दमानिया यांच्या तक्रारीमुळे वांधा होण्याची शक्यता आहे.

खडसे यांच्याविरुद्ध राज्यपालांना दिलेल्या निवेदनात दमानिया यांनी म्हटले आहे की, खडसेंवर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करताना माझ्याबाबत वापरलेली भाषा या सर्व गोष्टींमुळे त्यांना आमदार नियुक्त करू नका.

पवारांनी केला खडसेंना वाचवण्याचा प्रयत्न !

माध्यमांशी बोलताना अंजली दमानिया यांनी आरोप केला की, राष्ट्रवादीत प्रवेश करताना खडसेंनी माझ्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले. मी स्वत: राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना फोन करून त्यांच्याकडे खडसेंबाबत तक्रार केली होती. पण पवारांनी खडसे यांना वाचवण्याचा प्रयत्न केला!

एकनाथ खडसे यांनी वृत्तवाहीन्यांसमोर माझी बदनामी केली. खडसेंविरोधात वाकोला पोलीस ठाण्यात तक्रार केली. मात्र, त्यावर काहीच कारवाई केली गेली नाही; असा आरोपही त्यांनी केला आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना सर्व पुरावे दिले असून अधिकचे पुरावेही लवकरच देणार आहे व खडसेंविरूद्धची न्यायलयीन लढाई देखील सुरच ठेवणार आहे, असे दमानिया म्हणालात.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER