मुक्ताईनगर विधानसभा क्षेत्रातील ७१ ग्रामपंचायतीं जिंकल्या, खडसेंच्या दावा

Eknath Khadse

मुंबई : मुक्ताईनगर विधानसभा क्षेत्रातील ७१ ग्रामपंचायतीं जिंकल्या, असा दावा भाजपा (BJP) सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) गेलेले एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी केला. विजयी उमेदवारांचे अभिनंदन केले.

ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यापासून भाजपा आणि महाविकासआघाडी (Mahavikas Aghadi) हे दोघेही मुक्ताईनगरमध्ये आपलेच वर्चस्व असल्याचा दावा करत आहेत. एकनाथ खडसे यांनी सून रक्षा खडसे यांनी सोमवारी कोथळी गावात भाजपचा विजय झाल्याचा दावा केला होता. मात्र, एकनाथ खडसे यांची कन्या रोहिणी खडसे यांनी विजयी झालेले उमेदवार नाथाभाऊंना मानणारे असल्याचे सांगितले. त्यामुळे संभ्रम निर्माण झाला होता.

… आम्ही फक्त खडसे परिवाराचे

मुक्ताईनगर तालुक्यातील सर्वात महत्त्वाची कोथळी ग्रामपंचायतमध्ये एकूण अकरा जागा आहेत. दोन जागा बिनविरोध निवडले गेलेत. नऊपैकी पाच ठिकाणी शिवसेना जिंकली तर सहा उमेदवार म्हणतात, आम्ही ना राष्ट्रवादीचे ना भाजपाचे; आम्ही खडसे परिवाराचे! त्यामुळे इथे बहुमत कोणाचे हा संभ्रम कायम आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER