अखेर शिवसेना आणि काँग्रेसचं ठरलं, मुंबई महापालीतील तिजोरीची चावी शिवसेनेकडेच

Congress-BMC-Shivsena

मुंबई : मुंबई पालिकेतील (BMC)स्थायी आणि शिक्षण समिती अध्यक्षपदाची निवडणूक आज, होत आहे. या दोन्ही समित्यांच्या अध्यक्षपदासाठी शिवसेना, भाजप (BJP), काँग्रेसने (Congress) उमेदवार उभे केले आहेत. तिरंगी होणाऱ्या लढतीत शिवसेनेकडे (Shivsena) अधिक संख्याबळ आहे. पदरी संख्याबळ अधिक असले तरी आयत्या वेळी भाजपने काही वेगळी खेळी केली तर अध्यक्षपद गमवावे लागेल अशी चिंता सत्ताधारी शिवसेनेला आहे. तर दुसरीकडे उमेदवारी मागे घ्यायची की निवडणूक लढवायची असा पेच काँग्रेससमोर होता. मात्र मिळालेल्या माहितीनुसार, काँग्रेस आणि शिवसेनेत बंदद्वार झालेल्या चर्चेत काँग्रेसने माघार घेण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती पुढे आली आहे. त्यामुळे स्थायी आणि शिक्षण समितीच अध्यक्षपद शिवसेनेकडे राहणार असल्याचं निश्चित झाले आहे.

दरवर्षी मार्च-एप्रिल दरम्यान मुंबई महापालिकेत वैधानिक, विशेष आणि प्रभाग समित्यांच्या अध्यक्षपताच्या निवडणुकांचे वारे वाहू लागतात. अध्यक्षपद पदरात पडावे यासाठी नगरसेवक व्यूहरचना करण्यात गुंतलेले असतात. यंदा मार्चमध्ये करोनाचा संसर्ग सुरू झाला आणि त्यानंतर टाळेबंदी, संचारबंदी लागू झाली. त्यामुळे यंदा या निवडणुका वेळेत होऊ शकल्या नाहीत.

सत्ताधारी शिवसेनेने स्थायी समिती अध्यक्षपदासाठी विद्यमान अध्यक्ष यशवंत जाधव यांना पुन्हा रिंगणात उतरविले आहे. यंदा भाजपने या निवडणुकीत उमेदवार दिला आहे. त्यांनी मकरंद नार्वेकर यांना, तर काँग्रेसने असिफ झकेरिया यांना रिंगणात उतरविले आहे. मात्र काँग्रेसने या निवडणुकीतून माघार घेण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती पुढे आली आहे. त्यामुळे दोन्ही समितीच अध्यक्षपद शिवसेनेकडेच राहणार असल्याचे सांगितल्या जात आहे. याबाबतचे संकेत शिवसेनेचे नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिले आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आहे. त्यानुसार काँग्रेस विरोधी पक्ष म्हणून काम करणार आणि स्थायी समितीचे अध्यक्षपद शिवसेनेकडेच राहणार असल्याचा दावा परब यांनी केला.

ही बातमी पण वाचा : ‘मी आणि अमोल कोल्हे खूप नशीबवान आहोत, पवारांच्या राष्ट्रवादीत आलो’ – निलेश लंके

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER