लॉकडाऊन उठवण्यासाठी सरकारी पॅनलची विनंती

corona lockdown

नवी दिल्ली : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वैद्यकीय आणीबाणी, रुग्णालयांची उपलब्धता, विलगीकरम कक्षांची सुविधा या महत्त्वपूर्ण बाबी लक्षात घेऊन आता पूढे ताळेबंदात आणखी वाढ न करण्याची विनंती मुख्य सरकारी अधिका-यांच्या पॅनेलने केली आहे.

ही बातमी पण वाचा:- लॉकडाऊन काढताना याचाही विचार करा…

लॉकडाऊनचा चौथा टप्पा येत्या रवीवारी 31 मे रोजी संपणार आहे. या सरकारी पॅनेलने हा चौथा लॉकडाऊन उठवण्याकरिता एक रणनिती आखली आहे. कंटेंटमेंट झोन वगळता इतर ठिकाणचे लॉकडाऊन उठवण्याकरिता काही उपाययोजनाही सांगितल्या आहेत.

शाळा, महाविद्यालये, चित्रपटगृहे आणि धार्मिक स्थळे बंद राहतील असेही या पॅनलने म्हटले आहे. मात्र, ते वगळता इतर ठिकाणचे लॉकडाऊन उठवण्याविण्यासाठी या पॅनलने विनंती केली आहे.

अशी माहिती अधिका-यांनी इकॉनॉमिक टाईम्सला दिल्याचे वृत्त टाईम्सने दिले आहे. तसेच अद्याप आंतरराष्ट्रीय प्रवासास परवानगी देण्याचे प्रस्तावित केलेले नाही. येत्या काही दिवसांत अंतिम निर्णय होईल. असेही ते अधिकारी म्हणाले.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER