केव्हिन पीटरसन म्हणतो, आयपीएलच्या काळात आंतरराष्ट्रीय सामने ठेवू नका !

Kevin Pietersen

इंडियन प्रिमीयर लिग (IPL) ही आंतरराष्ट्रीय क्रिकेटला भारी पडत आहे का? आयपीएलमधील पैसे पाहता खेळाडूंचे प्राधान्यक्रम बदलत आहेत का? राष्ट्रीय संघ की आयपीएल अशा कोंडीत क्रिकेटपटू सापडले आहेत काय? हे वादाचे मुद्दे आहेत; पण अजूनही काही खेळाडू, उदाहरणार्थ मिशेल मार्श, जोश हेजलवूड, क्विंटन डी कॉक, लुंगी एन्जिडी हे आयपीएलपेक्षा राष्ट्रीय संघाला प्राधान्य देत आहेत आणि ते योग्यसुद्धा  आहे. आयपीएलपेक्षा राष्ट्रीय संघासाठी खेळणे केव्हाही महत्त्वाचे या मताशी बहुतेक सहमत असतील. अशा स्थितीत इंग्लंडचा माजी कर्णधार केव्हिन पीटरसन (Kevin Pietersen) याने एक अतिशय धक्कादायक विधान केले आहे.

तो म्हणतो की, आजच्या घडीला आयपीएल ही क्रिकेटची सर्वांत मोठी स्पर्धा आहे. अशा मोठ्या स्पर्धेच्या काळात आंतरराष्ट्रीय सामने ठेवू नयेत. क्रिकेट मंडळांनी आंतरराष्ट्रीय सामन्यांचा कार्यक्रम ठरवताना याची काळजी घ्यायला हवी.

काही इंग्लिश क्रिकेटपटू आयपीएलमध्ये सहभागी व्हावे की नाही याबद्दल द्विधा मन:स्थितीत आहेत; कारण आयपीएल संपल्यानंतर दुसऱ्याच दिवसापासून म्हणजे २ जूनपासून त्यांची न्यूझीलंडविरुद्धची दोन कसोटी सामन्यांची मालिका सुरू होत आहे. अशा वेळी आयपीएलमधील त्यांचा संघ अंतिम फेरीत पोहचला तर एकतर त्यांना अंतिम सामना सोडावा लागेल किंवा राष्ट्रीय संघासाठी खेळणे सोडावे लागेल. इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट मंडळाचे संचालक अॕशली गाईल्स यांनी आधीच स्पष्ट केले आहे की, इंग्लिश क्रिकेटपटूंना राष्ट्रीय संघासाठी खेळायची सक्ती केली जाणार नाही. यंदाच्या आयपीएलमध्ये १४ इंग्लिश क्रिकेटपटू वेगवेगळ्या संघांतर्फे खेळणार आहेत.

त्याचप्रमाणे आयपीएलच्या सुरुवातीच्या काळात दक्षिण आफ्रिका व पाकिस्तान दरम्यानच्या मालिकेचे सामने खेळले जाणार आहेत. त्यामुळे कासिगो रबाडा, लुंगी एन्जिडी, फाफ डू प्लेसीस, क्विंटन डी कॉक हे दक्षिण आफ्रिकन खेळाडू आयपीएल २०२१ च्या सुरुवातीच्या सामन्यांसाठी उपलब्ध नसतील.

ही बातमी पण वाचा : फलंदाजीत कोण अधिक सफल- विराट कोहली की बाबर आझम?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button