केतकीने व्यक्त केला डॉक्टरांवर राग

ketaki Chawle

मालिका किंवा सिनेमातील अभिनयापेक्षा केतकी चितळे (Ketki Chitale) हे नाव जास्त चर्चेत आलं ते सोशल मीडियावर सतत काहीतरी वादग्रस्त विधान केल्यामुळे किंवा नेटकऱ्यांकडून ती ट्रोल झाल्यामुळे. मात्र गेल्या सध्या केतकी हिनेच डॉक्टरी पेशावर ताशेरे ओढले आहेत.

केतकीला इपिलिप्सी अर्थात मेंदू विकार असल्याने तिला दाढदुखीवर उपचार घेण्यासाठी डॉक्टरांची मनधरणी करावी लागल्याने ती चिडली आहे. वैद्यकीय भाषेमध्ये या आजाराला इपिलिप्सीअसे म्हटले जाते. जेव्हा केतकी तिच्या दाढेच्या ट्रीटमेंटसाठी डॉक्टरांकडे गेली तेव्हा डॉक्टरांना तिच्या या विकाराबद्दल कळलं आणि त्यांनी केतकीच्या दाढेवर उपचार करण्यास नकार दिला.

यावरूनच केतकी सगळ्याच डॉक्टरांवर प्रचंड चिडली असून कोणत्याही रुग्णावर उपचार करणं हे डॉक्टरांचे कर्तव्य आहे ही शपथ सध्या डॉक्टर विसरले आहेत का असा प्रश्न तिने सोशल मीडियाच्या माध्यमातून उपस्थित केला आहे.

काही दिवसांपूर्वी अभिनेत्री केतकी चितळे हिच्या दाढेचे दुखणे सुरू झालं. तिने ज्या डॉक्टरांचा सल्ला घेतला त्यांनी दाढ काढण्याबाबत सुचवलं. केतकीने याच अनुभवाचा एक सणसणीत व्हिडिओ केला असून या व्हिडिओमध्ये केतकी असं म्हणते की जेव्हा दाढेवर उपचार करून घेण्यासाठी मी डॉक्टरांकडे गेले त्यावेळी त्यांनी माझी मेडिकल हिस्ट्री विचारली असता मी त्यांना मला मेंदूविकार असल्याचं सांगितलं तेव्हा त्या डॉक्टरांनी माझ्यावर उपचार न करण्याचा निर्णय घेतला. याच गोष्टीचा मला प्रचंड राग आला असून डॉक्टरांसाठी प्रत्येक रुग्ण हा रुग्ण असला पाहिजे. त्याची मेडिकल हिस्ट्री जाणून घेणे याचा अर्थ असा नव्हे कि त्याच्यावर उपचार करायचे नाहीत. आपण जेव्हा म्हणतो की आपण आपली प्रत्येक गोष्ट डॉक्टरांना खरी सांगितली पाहिजे असं म्हणतात. पण खरं सांगितल्यानंतर जर डॉक्टरांकडून अशा पद्धतीची वागणूक मिळत असेल तर डॉक्टरांना अंधारात ठेवलेलं बरं असेच आता म्हणावे लागेल. इतकंच बोलून केतकी थांबलेली नाही तर तिने डेंटल असोसिएशनलादेखील धारेवर धरले आहे.

शिवाय ज्या डॉक्टरांनी केतकीच्या दाढेवर उपचार करण्यास नकार दिला ते एका मेडिकल कॉलेजमध्ये प्रोफेसर आहेत. त्यामुळे जर असे प्रोफेसर असतील तर त्यांचे विद्यार्थी भविष्यात अशाच पद्धतीचे डॉक्टर बनून समाजामध्ये काम करतील आणि हे समाजासाठी घातक आहे असेही विधान तिने केले आहे. केतकीचे हा व्हिडीओ व्हायरल झाला असून केतकीच्या बोलण्याला विरोध करणारे नेटकरी तसेच तिचे चाहते या बाबतीत मात्र तिच्या बाजूने उभे राहिले आहेत.

केतकी चितळेने अनेक मराठी व हिंदी मालिकांमध्ये काम केलं असून सध्या ती सोशल मीडियावर सक्रिय असते. हा मेंदूचा एक विशिष्ट प्रकारचा आजार असून हा आजार असलेल्या रुग्णांना फीट येत असते. केतकी चितळे ही या आजारातून जात असून ती सोशल मीडियावर या आजाराबाबत अनुभव शेअर करते. केतकीने आत्तापर्यंत सास बिना ससुराल व मेरी मा अन्नपूर्णा या हिंदी मालिकांमध्ये काम केले आहे. तसेच तुझ्या वाचून करमेना, लगोरी, तुझा माझा ब्रेकअप, इथेच टाका तंबू ,लक्ष्मी सदैव मंगलम या मालिकेतही केतकीचा अभिनय पहावयास मिळाला होता. लक्ष्मी सदैव मंगलम या मालिकेच्या शूटिंग दरम्यान अनेकदा केतकीला या आजारामुळे फीट आल्याने या मालिकेतून तिला काढून टाकण्यात आलं होतं या वेळीही तिने या गोष्टी बाबत प्रचंड नाराजी व्यक्त केली होती. एखाद्या कलाकाराला एखादा विशिष्ट आजार आहे म्हणून त्याला काम करण्याची संधी मिळू नये यावर केतकीने तिच्या सोशल मीडिया पेजवरून तिची नाराजी व्यक्त केली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER