गुजरातचे माजी मुख्यमंत्री केशुभाई पटेल यांचं निधन

Keshubhai Patel passes away

अहमदाबाद : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) याना मोठा धक्का बसला आहे. आज गुजरातचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते केशुभाई पटेल (Keshubhai Patel) यांचं निधन झालं. वयाच्या ९२ व्या वर्षी केशुभाई पटेल यांची रुग्णालयात उपचारादरम्यान प्राणज्योत मालवली. त्यांना शुक्रवारी श्वास घेण्यासाठी अचानक त्रास होऊ लागल्यामुळे तातडीनं रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं.

गुजरातचे माजी मुख्यमंत्री केशुभाई पटेल हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सर्वात जवळचे होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. केशुभाई यांनी दोन वेळा गुजरातमध्ये मुख्यमंत्री म्हणून कार्यभार सांभाळला होता. केशुभाई पटेल यांनी १९९५ मध्ये प्रथम गुजरातच्या मुख्यमंत्रिपदाची सूत्रे हाती घेतली. त्यानंतर त्यांनी १९९८ ते २००१ या काळात दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपद भूषवले. त्यांनी राज्यात सहा वेळा विधानसभा निवडणुका जिंकल्या. केशुभाई पटेल यांनी २०१२ साली भाजप सोडून आपल्या ‘गुजरात परिवर्तन पार्टी’ची स्थापना केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER