हमास हल्ल्यात केरळमधील महिलेचा इस्त्रायलमध्ये मृत्यू

Kerala woman killed in Hamas attack - Maharashtra Today

मुंबई : केरळमधील एका महिलेचा इस्त्रायलमध्ये मृत्यू झाला आहे. पॅलेस्टाइनने केलेल्या रॉकेट हल्ल्यामध्ये महिलेने आपला जीव गमावला असल्याची माहिती कुटुंबीयांनी दिली आहे.

वृत्तानुसार, ३१ वर्षीय सौम्या व्हिडीओ कॉलवर पती संतोषसोबत बोलत असतानाच शहरावर रॉकेट हल्ला झाला. हे रॉकेट सौम्या यांच्या निवासस्थानावर कोसळलं आणि त्यांचे निधन झाले .

माझ्या भावाला व्हिडीओ कॉल सुरु असतानाच मोठा आवाज ऐकू आला. यानंतर अचानक व्हिडीओ कॉल कट झाला. आम्ही तात्काळ तेथील इतर आमच्या ओळखींच्या लोकांना फोन केले तेव्हा झालेल्या घटनेची माहिती मिळाली, असे संतोष यांच्या भावाने वृत्तपत्राला सांगितले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button