केरळ सरकारकडून २० हजार कोटींचे पॅकेज जाहीर; के. एन बालगोपाल यांची माहिती

kn balagopal - Maharashtra Today

तिरुवनंतपूरम :- अख्ख्या देशात कोरोनाने थैमान घातले आहे. राज्यात लसीचा तुटवडाही भासत आहे. या दुसऱ्या लाटेला नियंत्रणात आणण्यासाठी केरळ सरकारने २० हजार कोटींचे पॅकेज जाहीर केले आहे. याचबरोबर १८ वर्षांवरील व्यक्तिंच्या मोफत लसीकरणासाठी १ हजार कोटींची स्वतंत्र तरतूद केली आहे. तसेच मोफत लसीकरणासाठी संबंधित उपकरणे आणि सुविधा देण्यासाठी ५०० कोटी खर्च करणार आहेत, अशी माहिती अर्थमंत्री के. एन बालगोपाल यांनी दिली आहे.

गेल्यावेळी २० हजार कोटी रुपयांची तरतूद केली होती. ते महामारी रोखण्यासाठी वापरण्यात आला. मात्र, कोरोनाची दुसरी लाट आल्याने दुसऱ्या पॅकेजची घोषणा करण्यात आली आहे. नागरिकांना चांगल्या आरोग्य सुविधा देणे, त्यांच्या दोनवेळच्या जेवणाचा प्रश्न सोडवणे आणि कोरोना रोखण्यासाठी उपयायोजना करण्यासाठी २० हजार कोटी रुपये खर्च करणार आहे, असे बालगोपाल यांनी सांगितले. तसेच राज्यातील जनतेवर कोणताही नवा कर लादण्यात येणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

“देशात कोरोनाचे संकट सुरु असल्यामुळे अर्थव्यवस्था पुनरुज्जीवीत करण्याचा मागच्या बजेटचा उद्देश होता. मात्र, ते या संकटामुळे होऊ शकले नाही. यावेळी कोरोना पूर्णपणे रोखणे हे आमचे उद्दिष्टं आहे. ऑक्टोबरमध्ये कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता आहे. यामुळे कोरोना रोखण्यासाठी मोठ्या बजेटची गरज पडणार आहे.” असे त्यांनी सांगितले.

याचदरम्यान, कोरोनामुळे नोकरी गमावलेल्यांना आर्थिक मदत देणे आवश्यक आहे. या पॅकेजमध्ये मोफत लसीकरणाची घोषणा केली आहे. त्यासाठी १ हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. तसेच राज्याने या वर्षी ६.६ टक्के आर्थिक विकास दराचे लक्ष्य ठेवले आहे, असेही ते म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button