केजरीवाल यांनी विधानसभेत फाडली केंद्राच्या कृषी कायद्यांची प्रत

Arvind Kejriwal

दिल्ली :- आणखी किती बळी घेणार हा प्रश्न विचारत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी विधानसभेत केंद्राच्या कृषी कायद्याची प्रत फाडली. दिल्ली विधानसभेच्या विशेष अधिवेशनात कृषी कायद्यांवर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी कडाडून टीका केली.

ते म्हणालेत, शेतकऱ्यांच्या आंदोलनात आत्तापर्यंत २० पेक्षा जास्त शेतकरी शहीद झाले आहेत. आपल्या देशातला शेतकरी हा भगत सिंह यांच्या प्रमाणे कायद्यांविरोधात आंदोलन करतो आहे. मोदी सरकारने आता इंग्रजांपेक्षाही जास्त वाईटपणा करु नये.

करोना (Corona) काळात घाई घाईने हे तीन कायदे संमत करुन घेण्याची मोदी सरकारला काय गरज होती, असा प्रश्न अरविंद केजरीवाल यांनी विचारला. शेतकऱ्यांसाठी आणले हे कायदे ‘काळे कायदे’ आहेत. आम्ही त्यांचा धिक्कार करतो. दिल्ली राज्यात हे कायदे लागू होणार नाहीत असे अरविंद केजरीवाल यांनी विधानसभेत जाहीर केले.

योगींवर टीका

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांच्यावर टीका करताना केजरीवाल म्हणालेत, योगी यांनी बरेली येथे रॅली काढून तीन कृषी कायद्यांचे फायदे समजावून सांगितले. भाजपाचे सगळे नेते पाठ केल्याप्रमाणे कृषी कायद्यांचे फायदे समजावून सांगत आहेत. शेतकरी देशात कुठेही त्याचा शेतमाल विकू शकतो. मात्र या सगळ्या हवेतल्या गप्पा आहेत. शेतकऱ्यांमध्ये कुणीही भ्रम पसरवलेला नाही. भाजपाच्या नेत्यांमध्ये भ्रम पसरवण्यात आला आहे.

कृषी कायद्यांवर चर्चा करण्यासाठी चर्चा करण्यासाठी दिल्ली विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलवण्यात आले होते. कृषी कायद्यांवर चर्चा करण्यात आली. कृषी कायदे नाकारण्याचा निर्णय झाला. जय जवान-जय किसानच्या घोषणा देण्यात आल्यात.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER