सूरत मनपात आप पक्ष प्रमुख विरोधी पक्ष, २६ ला केजरीवालांचा रोड शो

नवी दिल्ली : गुजरातमध्ये (Gujarat civic body polls) पहिल्यांदाच महापालिका निवडणूक लढवणाऱ्या आम आदमी पार्टीने चांगले यश मिळवले. सूरत मनपात २७ जागा जिंकून आप प्रमुख विरोधी पक्ष ठरला आहे. याचा आनंद साजरा करण्यासाठी आपचे नेते व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) २६ फेब्रुवारीला सूरतमध्ये रोड शो करणार आहेत.

नव्या राजकारणाची सुरुवात

सूरत मनपात भाजपाने ९३ जागा जिंकून सत्ता राखली आहे. काँग्रेसला एकही जागा मिळाली नाही. गुजरात मध्ये ही नव्या राजकारणाची सुरुवात आहे, असे केजरीवाल म्हणालेत.

पाटीदारांचा प्रभाव

सूरत हा पाटीदार समाजाचा गड आहे. गेल्या २५ – ३० वर्षात पाटीदार समाज भाजपाच्या पाठीशी राहिला आहे. मात्र या निवडणुकीत पाटीदार समाजातील मतदारांनीच आम आदमी पक्षाच्या विजयात महत्वाची भूमिका बजावली. आम आदमी पार्टीचे गुजरात प्रमुख गोपाळ इटालिया हे सूरतमधील पाटीदार समाजातूनच येतात, त्याचा परिणाम या निवडणुकीत दिसला असे राजकीय निरीक्षकांचे मत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER