‘आम्ही तुमच्या पाठीशी आहोत!’ उद्धव ठाकरेंसाठी केजरीवालांचे ट्विट

Arvind Kejriwal-Uddhav Thackeray

मुंबई : एकीकडे महाराष्ट्र कोरोना संकटाचा सामना करत आहे तर दुसरीकडे राज्यावर नैसर्गिक संकट ओढवले आहे. कोकण किनारपट्टीवर कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने महाराष्ट्रावर निसर्ग नावाचे चक्रीवादळ धडकणार आहे. या चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका हा मुंबई, ठाण्यासह कोकण किनारपट्टीला बसणार आहे.

ही बातमी पण वाचा:- निसर्ग’ मुंबईत धडकणार; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जिल्हाधिका-यांच्या संपर्कात 

या संकटमय काळात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ट्विट करत उद्धव ठाकरे यांना या कठीण प्रसंगी आम्ही तुमच्या पाठीशी असल्याचे म्हटले आहे.

निसर्ग वादळाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतील जनतेच्यावतीने महाराष्ट्रातील जनता आणि तुम्हाला पूर्ण पाठिंबा दर्शवत आहोत. महाराष्ट्रातील जनतेच्या सुरक्षेसाठी आम्ही प्रार्थना करत आहोत, असे अरविंद केजरीवाल यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER