‘तुझ्या हातून अशीच सेवा घडत राहो !’ पवारांनी केले निलेश लंकेंच्या कामाचे कौतुक

Sharad Pawar - Nilesh Lanke - Maharashtra Today
Sharad Pawar - Nilesh Lanke - Maharashtra Today

अहमदनगर : सलग दुसऱ्या वर्षी देशासह राज्यात कोरोनाची लाट आलेली आहे. त्यामुळे गेल्या वर्षीपेक्षाही आताची परिस्थिती गंभीर आहे. या अस्मानी संकटात आमदार निलेश लंके यांनी शरद पवारांनी दिलेल्या सल्ल्यानुसार भाळवणीत एक हजार बेड्सचे शरच्चंद्र पवार कोविड सेंटर उभारून जनसामान्यांना आधार दिला आहे. एकीकडे राज्य सरकार कोविड सेंटर उभारण्यासाठी प्रयत्न करताना दिसत आहेत, तर लंके यांच्या कोविड सेंटरमध्ये मोठ्या प्रमाणात रुग्ण दाखल झाले असून, त्यांच्यावर उपचारही सुरू झाले आहेत. ही माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांना  मिळताच त्यांनी आज निलेश लंके (Nilesh Lanka) यांना फोन करून त्यांच्या कामाचं कौतुक केलं.

शरद पवार यांनी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळताच निलेश लंके यांना फोन केला. लंके यांनी सुरू केलेल्या कोविड सेंटरची बातमी पाहून पवारांनी त्यांचं कौतुक केलं. तसेच ‘तू इतकं चांगलं कोविड सेंटर उभारलं मला कळालं, तू इतरांची काळजी घेतोय; मात्र स्वतःची पण काळजी घे. तुझ्या हातून अशीच सेवा घडत राहो, काही मदत लागल्यास कळव.’ अशी भावनिक सादही घातली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button