आरक्षण अबाधित ठेवा; अन्यथा परिणाम भोगा: खा. उदयनराजे

Udayanraje Bhosle

सातारा: मराठा समाजाच्या (Maratha reservations) प्रश्नांबाबत सरकार कधीच गंभीर नव्हते. त्यामुळे आज त्याचा परिणाम मराठा समाजाला भोगावा लागत आहे. मी सरकारला जाहीर आवाहन करतो. सरकारने तातडीने अध्यादेश काढून मराठा आरक्षण अबाधित ठेवावे; अन्यथा होणाऱ्या परिणामाला सामोरे जावे, अशा शब्दात छत्रपती शिवाजी महाराजांचे थेट तेरावे वंशज खा. छ. उदयनराजे भोसले (Udayan Raje Bhosle) यांनी मराठा आरक्षणासंदर्भात आपली तोफ डागली आहे.

मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयात स्थगिती मिळाल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असलेल्या साताऱ्यात त्याचे तीव्र पडसाद उमटत आहेत. सातारा मराठा क्रांती मोर्चाने आक्रमक भूमिका घेतली असून, छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज खा. छ. उदयनराजे भोसले व आ. शिवेंद्रराजे भोसले यांनी राज्य सरकारने अध्यादेश काढून तातडीने स्थगिती उठवण्याच्या दिशेने पावले उचलली पाहिजेत, अशी भूमिका घेतली आहे; अन्यथा साताऱ्याचा मराठा क्रांती मोर्चा जो निर्णय घेईल त्या निर्णयाबरोबर आम्ही राहू, असा इशारा दोन्ही राजांनी दिला आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठ्यांची राजधानी चांगलीच तापली असून त्याचे पडसाद उमटण्याची चिन्हे आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER