आरक्षण : संयम ठेवला, अन्याय सहन करणार नाही; मराठा समाजाचा ठाकरे सरकारला इशारा

CM Thackeray-Vinod Patil1

मुंबई :- मराठा आरक्षणाचा प्रश्न सुप्रीम कोर्टात प्रलंबित असताना SEBC प्रवर्गासाठी आरक्षण न ठेवता शैक्षणिक संस्थांमधील प्रवेश प्रक्रिया सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. ठाकरे सरकारच्या (Thackeray Government) या निर्णयाविरोधात मराठा समाजातील विद्यार्थ्यांमध्ये असंतोष पसरला आहे. याबाबत आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील (Vinod Patil) यांनी ठाकरे सरकारला इशारा दिला – आम्ही संयम ठेवला; पण अन्याय सहन करणार नाही, हे सरकारने लक्षात ठेवावे.

विनोद पाटील म्हणाले की, सरकारने मराठा विद्यार्थ्यांना डावलून प्रवेश प्रकिया सुरू करणे हा विद्यार्थ्यांचा आणि संपूर्ण समाजाचा विश्वासघात आहे, याबाबत नव्याने कायदेशीर लढाई लढण्यासाठी आम्ही सज्ज आहोत. आम्हाला न्याय देणे शक्य असूनही आम्हाला डावलले गेले, असा आरोप त्यांनी राज्य सरकारवर केला.

वैद्यकीय व सर्वच शैक्षणिक प्रवेश प्रक्रियेत मराठा विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून राज्य सरकारकडे वेळोवेळी सुपर नुमररी कोट्यातून विद्यार्थ्यांना प्रवेश देणे, १२ टक्क्यांप्रमाणे सर्व महाविद्यालयांमध्ये मॅनेजमेंटचा कोटा ताब्यात घेऊन विद्यार्थ्यांना प्रवेश देणे, विद्यार्थ्यांच्या फीमध्ये १०० टक्के सवलत देणे यासारखे पर्याय होते. परंतु, सरकार याबाबत चालढकलच करते आहे. ९ सप्टेंबर २०२० नंतर सर्व प्रवेश SEBC वर्गासाठी आरक्षित न ठेवता करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. ठाकरे सरकार विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळते आहे, असा आरोप विनोद पाटील यांनी केला.

मराठा विद्यार्थ्यांचा विश्वासघात – भाजपा
राज्य सरकारने मराठा समाजाला मिळालेल्या आरक्षणाचे मातेरे केले आहे. मराठा समाजाला आता MSEB नोकऱ्यांसाठी OPEN या कॅटेगिरीतून अर्ज करावे लागतील, असा गोंधळ सरकारने करून ठेवला आहे. नितीन राऊत (Nitin Raut) यांनी शिक्षणातले SEBC चे १२ टक्के आरक्षण आहे तेसुद्धा रद्द केले. मराठा समाजाला न्याय द्यायचा असेल तर ‘सुपर न्यूमरीकल कन्सेप्ट’ जी अनेकदा व्यवहारात आणली गेली आहे ती तुम्ही का लागू करत नाही? असा प्रश्न भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी सरकारला विचारला आहे. मराठा समाजाच्या हितासाठी सगळ्या संघटनांनी एकत्र येऊन जर निर्णय घेतला की, भाजपा या आंदोलनाचं नेतृत्व करेल, तर भाजपा त्यासाठी तयार आहे, असेही चंद्रकांत पाटील म्हणालेत.

ही बातमी पण वाचा : सरकारमधील तिघांच्या वादामुळे मराठा आरक्षणाचे मातेरे झाले; चंद्रकांतदादांचा आरोप

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER