‘मुख्यमंत्री ठाकरेंना तुमच्याकडेच ठेवा आणि रोज उठून सलाम ठोकत बसा’ – नितेश राणे

Jitendra Awhad - CM Uddhav Thackeray - Nitesh Rane - Maharashtra Today

मुंबई : राज्यात झपाट्याने वाढत चाललेल्या कोरोना (Corona) रुग्णांची संख्या लक्षात घेता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी पुन्हा एकदा महाराष्ट्रात लॉकडाऊनचा (Lockdown) इशारा दिला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भाषणानंतर विरोधकांनी मुख्यमंत्र्यांवर जोरदार टीका केली आहे. मात्र, गृहनिर्माण मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनीही विरोधकांना लक्ष्य करत जोरदार प्रत्युत्तर दिलं होतं.

पत्नी रुग्णालयात, मुलगाही कोविडशी झगडतोय. तरीही धीरदोक्तपणाने हा माणूस महाराष्ट्र सांभाळतोय.टिका करणं सोपं आहे. पण उद्धव ठाकरे होणं अवघड आहे. स्वतःच्या हृदयात अनेक स्टेन्स असताना देखील ज्या पद्धतीने मुख्यमंत्री मा. उद्धवजी ठाकरे महाराष्ट्र सांभाळतायेत, त्यास सलाम! सलाम!! सलाम! असे भावनिक ट्विट करत जितेंद्र आव्हाड यांनी विरोधकांना धारेवर धरलं होतं. मात्र जितेंद्र आव्हाड यांच्या या ट्विटनंतर भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंसह जितेंद्र आव्हाड यांना देखील टोला लगावला आहे.

नितेश राणे (Nitesh Rane) ट्विट करत म्हणाले की, जितेंद्र आव्हाड बरोबर बोलले. उद्धव ठाकरे बनणे अवघड आहे. कारण देव पण परत अशी चूक करायची हिंमत करणार नाही, अशी चूक एकदाच होते, असा टोला नितेश राणे यांनी लगावला आहे. तसेच महाराष्ट्राची वाट लावणे..महाराष्ट्र विकायला काढणे..कुटुंबापलीकडे नाही बघणे..म्हणजे महाराष्ट्र सांभाळणे म्हणतात, मग उद्धव ठाकरेंना तुमच्याकडेच ठेवा आणि रोज उठून सलाम ठोकत बसा, अशी घणाघाती टीका नितेश राणे यांनी आव्हाडांवर केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button