लॉकडाऊनची मानसिकता ठेवा, जनतेला पूर्वसूचना देणार; राजेश टोपेंची माहिती

Rajesh Tope

जालना :- राज्यात लॉकडाऊनआधी जनतेला पूर्वसूचना देणार असल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. आज अर्थमंत्री अजित पवार आणि आरोग्य मंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांची जालन्यात बैठक झाली. यावेळी लॉकडाऊनमधील येणाऱ्या अडचणींवर चर्चा झाली. दरम्यान, लॉकडाऊनची जनतेने मानसिकता ठेवावी आणि लॉकडाऊन लावण्याआधी जनतेला पुरेसा वेळ आणि पूर्वसूचना देण्यात येईल, अशी माहिती टोपे यांनी दिली आहे.

३० टक्के निधी कोरोना उपाययोजनांसाठी वापरण्यास परवानगी; अजित पवारांचा निर्णय
कोरोनासंकटाविरुद्धची लढाई अधिक प्रभावी करण्यासाठी जिल्हा नियोजन समितीचा ३० टक्के निधी कोरोनाप्रतिबंधक उपाययोजनांसाठी वापरण्यास परवानगी दिली जाईल. रेमडिसिवीर औषध किरकोळ विक्रेत्यांमार्फत न विकता, वितरकांमार्फत थेट रुग्णालयांना दिले जाईल. हे गरजू रुग्णांनाच वापरले जाईल. जिल्हाधिकारी यावर नियंत्रण ठेवतील. कोरोनाच्या लढाईत पुढचे १५ दिवस महत्त्वाचे आहे, याकाळात रुग्णांना बेड, व्हेंटीलेटर, ऑक्सिजन, रेमडिसिवीर आदी बाबी उपलब्ध करण्याची कार्यवाही युद्धपातळीवर करावी. या लढाईसाठी निधी आणि मनुष्यबळ कमी पडू देणार नाही, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिला. या लढाईला बळ व वेग देण्यासाठी, अधिग्रहीत खासगी रुग्णालयांमधील सुविधांच्या खर्चास मंजूरी देण्याचे अधिकार विभागीय आयुक्तांना देण्यात येतील, अशी घोषणाही पवारांनी केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button