या “ब्रँड”च्या प्रेमात तेव्हापासून जेव्हा…; राज ठाकरेंसोबतचा फोटो केदार शिंदेची केला शेयर

Raj Thackeray - Kedar Shinde

मुंबई : “महाराष्ट्रात ठाकरे ब्रँडचा (Thackeray Brand) जोर असायला हवा. ज्या दिवशी ठाकरे ब्रँडचे पतन होईल त्या दिवसापासून मुंबईचे पतन व्हायला सुरुवात होईल. ” अशा शब्दांत शिवसेना (Shiv Sena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांना साद घातली आहे . यावरून दिग्दर्शक केदार शिंदे यांनी राज ठाकरे यांच्यासोबतचा फोटो पोस्ट केलेले ट्विट व्हायरल होते आहे.

केदार शिंदे (Kedar Shinde) यांनी राज ठाकरे यांच्यासोबतचा एक जुना फोटो ट्विटरवर शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत ‘या “brand” च्या प्रेमात तेव्हापासून जेव्हा photo मिळवण्याची धडपड होती.. कधी मांडीला मांडी लावून बसेन, मैत्री होईल असं स्वप्नातही वाटले नव्हते !!!’ असे म्हटले आहे. त्यांचे हे ट्विट सध्या चर्चेत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER