केदार साळुंखे याने केले सायकलिंगमध्ये चार विश्वविक्रम

Kedar Salunkhe

कोल्हापूर : सात वर्षाच्या विश्वविक्रमवीर केदार विजय साळुंखे याने आज शिवजयंती निमित्त “STOP VIOLENCE AGAINST WOMEN” (महिलांवरील अत्याचार थांबवा) चा संदेश देत उजळाईवाडी,तावडे हॉटेल, सांगली फाटा,शिरोली, वाठार किणी टोल नाका, परत कसबा बावडामार्गे पोलीस अधीक्षक चौक कोल्हापूर शहर असे 45 किलोमीटरचे अंतर 105 मिनिटांमध्ये पूर्ण करायचे होते ते त्याने 79 मिनटांमध्येच पूर्ण करून स्वतःच्या नावावर 4 विश्वविक्रम नोंदविले. त्याच्या या विक्रमाची नोंद चिल्ड्रन बुक ऑफ रेकॉर्ड (ग्लोबल)यामध्ये यामध्ये झाली असून यामध्येच त्याने हे चार विश्वविक्रम नोंद केले आहेत.एकाच दिवशी एकाच वेळी चार विश्वविक्रम करणारा तो पहिलाच सायकलिस्ट ठरला आहे.

आयुक्त कलशेट्टी यांनी उद्घाटनानंतर त्यांना केला पाच हजार रुपये दंड

यामध्ये त्याने फास्टेस्ट क्वार्टर सायकलिंग मॅरेथॉन, फास्टेस्ट हाफ सायकलिंग मॅरेथॉन, फास्टेस्ट फुल सायकलिंग मॅरेथॉन फास्टेस्ट पाच किलोमीटर सायकलिंग रन असे चार विक्रम त्याच्या नावावर नोंद झाले आहेत. फास्टेस्ट क्वार्टर सायकलिंग मॅरेथॉन ही 10.5 किलोमीटर अंतर 22 मिनिट 30 सेकंदात पूर्ण करायची होती ती त्याने 19 मिनिट 22 सेकंदात पूर्ण केली आहे. तर फास्टेस्ट हाफ सायकलिंग मॅरेथॉन ही 21.1 किलोमीटरचे अंतर 47.30 सेकंदात पूर्ण करायचे होते ते त्याने 40 मिनिटात पूर्ण केले.तर फास्टेस्ट फुल सायकलिंग मॅरेथॉन ही 42.195 किलोमीटर अंतर हे 105 मिनिटात पूर्ण करायचे होते ते त्याने 76 मिनिटात पूर्ण केले.26 मिनिट आधीच त्याने विश्वविक्रम केला.फास्टेस्ट 5 किलोमीटर सायकलिंग रन ही 10 मिनिटात पूर्ण करायची होती ती त्याने 7.48 मिनिटात पूर्ण केली.

आज सकाळी या विश्वविक्रमास उजळाईवाडी येथून सकाळी 7 वाजता सुरुवात झाली यावेळी प्रमुख उपस्थिती गांधीनगर चे सहायक पोलिस निरीक्षक दीपक भांडवलकर व निरीक्षक मनमोहन रावत व कोरगावकर ट्रस्टचे अध्यक्ष श्री अमोल कोरगावकर यांच्या हस्ते या विक्रमाची सुरुवात झाली.हा विक्रम तावडे हॉटेल, सांगली फाटा, टोप, वाठार, किनी टोल नाका परत टोप, शिये फाटा, कसबा बावडामार्गे पोलीस अधीक्षक चौक कोल्हापूर येथे समाप्त झाला. त्याने विश्वविक्रम हा भारत पेट्रोल पंप येथे कसबा बावडा येथे पूर्ण केला.

पोलीस अधीक्षक चौक तिरंगा झेंडा येथे आल्यानंतर सकाळी त्याचे जलोशी स्वागत ढोल ताशांच्या गजरात फुलांची उधळण करून करण्यात आले. याठिकाणी आल्यानंतर त्याचे महापौर सौ.निलोफर आजरेकर , उपजिल्हाधिकारी संजय शिंदे , ग्लोबल रिचर्स अँड रेकॉर्ड सेंटर मनमोहन रावत आदी स्वागतपर कार्यक्रमास उपस्थित होते. छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या प्रतिमा पूजनाने कार्यक्रमास सुरुवात झाली कार्यक्रमाचे प्रास्ताविक गोरख गोरख कोळी यांनी केले यावेळी निरीक्षक रावत यांनी केदार याने 4 विश्वविक्रम पूर्ण केल्याची घोषणा केली.