28 सप्टेंबरपासून सुरु होणार केबीसी 12

KBC

अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनी आपल्या आवाज आणि वक्तृत्व शैलीने केबीसीला एका उंचीवर नेऊन ठेवले आहे. केबीसीमुळे प्रेक्षकांना जनरल नॉलेज मिळते त्यामुळेच केबीसीची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहात असतात. केबीसी 12 चीही प्रेक्षक आतुरतेने वाट पाहात आहेत. गेल्या काही दिवसांपासून केबीसीबाबत बातम्या येत होत्या परंतु त्याच्या प्रसारणाची तारीख जाहीर होत नव्हती. केबीसीचे शूटिंग सुरु असतानाच अमिताभ बच्चन यांना कोरोनाची लागण झाली. कोरोनातून बरे होऊन त्यांनी पुन्हा एकदा केबीसीचे शूटिंग सुरु केले आहे.

सेटवर त्यांच्या प्रकृतीची योग्य ती काळजी घेतली जात आहे. केबीसी 28 सप्टेंबरपासून सुरु होणार असून सोमवार ते शुक्रवार रात्री 9 वाजता प्रसारित होणार आहे. कोरोना असल्याने निर्मात्यांनी कार्यक्रमाच्या रुपरेखेत बदलही केला आहे. लाईव्ह ऑडियंस ही या कार्यक्रमाची खासियत होती परंतु यावेळी लाईव्ह ऑडियंस शोमध्ये दिसणार नाहीत. तसेच जे प्रेक्षक हॉट सीटसाठी येऊ इच्छिणार आहेत त्यांना अगोदर सेल्फ क्वारंटाईन केले जाणार आहे. त्यानंतर त्यांना फास्टेस्ट फिंगर फर्स्ट राउंड खेळण्याची संधी दिली जाणार आहे. तसेच सेटवर मास्क, सॅनिटाईझर आणि सोशल डिस्टंसिंगचेही काटेकोरपणे पालन केले जाणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER