कॅटरीना करणार विजय सेतुपतीसोबत श्रीराम राघवनच्या थ्रिलर सिनेमात काम

प्रख्यात दिग्दर्शक श्रीराम राघवनने (Shriram Raghavan) अभिनेत्री कॅटरीना कैफ (Katrina Kaif) आणि साउथचा सुपरस्टार विजय सेतुपती यांना एकत्र आणले आहे. विजय सेतुपतीने खलनायकाची भूमिका साकारलेला ‘मास्टर’ (Master) सिनेमा सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. या सिनेमात थलपती विजय नायकाच्या भूमिकेत आहे. विजय सेतुपती आता हिंदीतही प्रेक्षकांना आपलेसे करण्यासाठी येणार आहे. श्रीराम राघवनने एका थ्रिलर सिनेमाची योजना आखली असून हा सिनेमा एप्रिलमध्ये फ्लोअरवर जाणार आहे. या सिनेमाचे बरेचसे शूटिंग पुणे आणि मुंबईत केले जाणार आहे.

सिनेमासी संबंधित सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हॉलिवुड सिनेमाप्रमाणे हा सिनेमा फक्त दीड तासाचाच तयार केला जाणार असून या सिनेमाला इंटरव्हल ठेवला जाणार नाही. हा एक प्रेक्षकांना खुर्चीला बांधून ठेवणारा थ्रिलर असल्याने प्रेक्षकांना शेवटपर्यंत खुर्चीवर बसवून ठेवण्यासाठीच इंटरव्हल न ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. केवळ 30 दिवसात या सिनेमाचे शूटिंग पूर्ण केले जाणार आहे. कोरोना (Corona) असल्याने जास्तीत जास्त शूटिंग इनडोअरच केले जाणार असल्याने 30 दिवसात सिनेमा आरामात पूर्ण होईल आणि जुलै ऑगस्टमध्ये सिनेमा रिलीज केला जाणार आहे.

कॅटरीना सध्या सिद्धांत चतुर्वेदी आणि ईशान खट्टरसोबत ‘फोन भूत’ सिनेमाचे शूटिंग करीत असून मार्चमध्ये ती सलमान खानसोबत ‘टायगर 3’ चे शूटिंग सुरु करणार आहे.

ही बातमी पण वाचा : राष्ट्रीय पुरस्कार स्वीकारायला जाताना ड्रेससाठी पैसे नव्हते कंगनाकडे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER