
बॉलिवुडमध्ये (Bollywood) सध्या कॅटरीना कैफचे (Katrina Kaif) नाव आघाडीच्या नायिकांमध्ये घेतले जाते. पहिल्या सिनेमात अत्यंत बोल्ड भूमिका करून नंतर स्वतःचे वेगळे स्थान कॅटरीनाने तयार केले. आता कॅटरिनाची लहान बहिण इसाबेलही (Isabelle) रुपेरी पडद्यावर नायिका म्हणून आगमन करणार आहे. तिच्या पहिल्या सिनेमाचा ‘सुस्वागतम खुशामदीद’ (Suswagatam Khushaamadeed) फर्स्ट लुक गुरुवारी रिलीज करण्यात आला. या सिनेमात इसाबेल पुलकित सम्राटसोबत (Pulkit Samrat) रोमांस करताना दिसणार आहे.
पुलकित सिनेमात अमर नावाच्या नायकाची भूमिका साकारत असून त्याने सिनेमाचे पहिले फोटो इंस्टाग्राम वर शेअर केले आहेत. या फोटोंसोबत पुलकितने, ‘नमस्ते-आदाब. आता लवकरच तुमच्याशी भेट होईल. सुस्वागतम खुशामदीदचा फ़र्स्ट लुक सादर आहे’ असे लिहिले आहे. या हाज़िर है। या अमरच्या नूर नावाच्या प्रेयसीची भूमिका इसाबेल साकारत आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन धीरज कुमारने केले आहे. इनसाइट इंडिया आणि एंडेमोल शाइन इंडिया, यलो अँट प्रोडक्शंस या सिनेमाची निर्मिती करीत असून मनीष किशोरने सिनेमाची कथा लिहिली आहे.
इसाबेल गेल्या काही वर्षांपासून बॉलिवुडमध्ये संघर्ष करीत असून सलमानबरोबर तिचे नावही जोडले गेले होते. सिनेमात नायिकेची मुख्य भूमिका साकारण्यापूर्वी इसाबेलने माशाल्लाह या म्यूझिक व्हीडियोमध्ये काम केले होते. खरे तर सलमानने इसाबेलसाठी 2014 मध्ये ‘डॉ. कॅबी’ नावाचा एक कॅनेडियन सिनेमा तयार केला होता. या सिनेमात इसाबेलने कुणाल अय्यरसोबत काम केले होते. या सिनेमाबाबत हिंदी इंडस्ट्रीत काहीही चर्चा झाली नाही. त्यानंतर सलमानने बहिण अर्पिताचा नवरा आयुषची नायिका म्हणून इसाबेलला साईन करून ‘क्वाथा’ची सुरुवात करण्याचे ठरवले होते. परंतु हा सिनेमाही तयार झाला नाही. त्यानंतर इसाबेल आणि सूरज पंचोलीचा ‘टाइम टू डांस’ सिनेमाचीही घोषणा करण्यात आली पण हा सिनेमासुद्धा पुढे सरकला नाही. आता मात्र इसाबेल पुलकित सम्राटबरोबर नायिका म्हणून रुपेही पडद्यावर येण्यास सज्ज झाली आहे.
बहीण कॅटरीनाप्रमाणे इसाबेलला यश मिळते का याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला