कतरिना कैफ आणि अक्षय लवकरच सूर्यवंशीत झळकणार

katrina kaif

मुंबई :- कतरिना कैफ आणि अक्षय कुमार ही जोडी ‘वेलकम’ या चित्रपटातून प्रसिद्धी झोतात आली. यांनतर या जोडीने सिंग इज किंग, बील्यु, दे दना दन, तीस मार खान अशी सुपरहिट चित्रपट देत चाहत्यांच्या मनावर राज करून गेली. तब्बल १० वर्षांनंतर ही जोडी ‘ सूर्यवंशी’ या चित्रपटात एकत्र दिसणार आहे. सलमान सोबत अलीकडेच कतरीना भारत सिनेमात प्रेक्षकांच्या भेटीला आली होती.

कतरिना कैफ लवकरच अक्षय कुमारसोबत सूर्यवंशीमध्ये स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे. कतरिनाने तिच्या सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोसोबत तिने अक्षय कुमार, करण जोहर, रोहित शेट्टी यांना टॅग केले आहे. कॅटने शेअर केलेल्या फोटोमध्ये पोलिसांच्या वर्दी आहे ज्यावर वीर सुर्यवंशी असे लिहिलेले आहे. या सिनेमात अक्षय कुमारच्या भूमिकेचे नाव वीर सुर्यवंशी आहे.

‘सुर्यवंशी’ या सिनेमात अक्षय कुमार एटीएफ अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. दहशतवादाविरोधात तो लढताना दिसेल. हा सिनेमा पुढच्या वर्षी २७ मार्च २०२० रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘सिम्बा’प्रमाणेच रोहित शेट्टीचा हा आगामी चित्रपटही एका साऊथच्या सिनेमाचा रिमेक असल्याचे मानले गेले होते. तामिळ भाषेतील ‘सूर्यवंशी’ याचाच हा हिंदी रिमेक असल्याची चर्चा होती. ही बातमी आली आणि अनेकांचा चटकन विश्वास बसला. कारण रोहितने याआधीही अनेक दाक्षिणात्य चित्रपटांचे हिंदी रिमेक बनवले आहेत. पण ही बातमी ऐकताच रोहित प्रचंड संतापला होता.

‘सूर्यवंशी’ कुठल्याही चित्रपटाचा रिमेक नाही. ही एक ओरिजनल स्टोरी आहे. दीर्घकाळापासून यावर काम सुरु होते, असे त्याने यानंतर स्पष्ट केले होते. तुम्हाला ठाऊक असेलच की, केवळ साऊथमध्येच नाही तर हिंदीतही ‘सूर्यवंशी’ नावाचा चित्रपट याआधी बनला आहे. यामुळेच चाहते बुचकड्यात पडले होते. मात्र अनेक वर्षानंतर कॅट अक्षय सोबत दिसणार आल्याने चाहत्यांची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे.