रबाडा खेळला की विकेट काढणारच, हे सूत्र पक्के !

Kasigo Rabada.jpg

दिल्ली कॅपिटल्सचा जलद गोलंदाज कसिगो रबाडा (Kasigo Rabada) ह्याची कामगिरी अशी आहे की, त्याच्याबद्दल खात्रीने सांगता येते की, तो सामन्यात खेळला तर विकेट काढणारच. गेल्या सलग २० सामन्यांपासून असेच होतेय. आयपीएलमध्ये (IPL) धावांची बरसात व षटकार- चौकारांची आतषबाजी होत असताना त्याचे हे सातत्य विलक्षण आहे. त्याने थोडथोडक्या नाही तर गेल्या सलग २० सामन्यांमध्ये किमान एक तरी विकेट काढली आहे.

या बाबतीत आता केवळ ड्वेन ब्राव्हो (Dwayne Bravo) हाच त्याच्यापुढे आहे तर विनयकुमारला रबाडानेमागे टाकले आहे. ड्वेन ब्राव्होने २०१२ ते २०१५ दरम्यान लागोपाठ २७ सामन्यांत किमान एकतरी विकेट काढली आहे तर विनयकुमारने २०१२-१३ मध्ये १९ सामन्यांत अशी कामगिरी केली आहे. ब्राव्हो, रबाडा व विनयकुमारनंतर लसिथ मलिंगा आहे, ज्याने २०१५ ते २०१७ दरम्यान सलग १७ सामन्यांत एकतरी विकेट काढली होती.

रबाडाने राजस्थान रॉयल्सविरुद्ध ३५ धावात ३ बळी मिळवताना यंदा ६ सामन्यांत आपल्या बळींची संख्या १५ वर नेली आहे. यासह तो सध्यातरी पर्पल कॅपचा मानकरी आहे. यंदा गोलंदाजीत त्याची सरासरी १२.३३ ची असून इकॉनॉमी ७.५० अशी प्रभावी आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER