काश्मीर : दहशतवाद्यांचा अड्डा उद्ध्वस्त

Terrorist

जम्मू : जम्मू-काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यातील मन्याल भागात सुरक्षा दलांनी शुक्रवारी दहशतवाद्यांचा छुपा अड्डा उद्ध्वस्त केला व शस्त्रे – दारूगोळा जप्त केला.

ठाणामंडीतील अझमताबाद भागात संशयास्पद हालचाली सुरू आहेत, अशी माहिती मिळाल्यानंतर लष्कर व पोलीस यांनी मन्याल, दाना व कोपरा येथे संयुक्त शोधमोहीम सुरू केली. मन्याल येथील अड्डा शोधून काढला. या अड्ड्यात ४ पिस्तुले व त्यांची ८ मॅगझिन, एक एके रायफल आणि तिचे २ मॅगझिन, ५४ काडतुसे आणि इतर साहित्य सापडले, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

काश्मीर खोऱ्यात पाठवण्यासाठी शस्त्रे व दारूगोळ्याचा हा साठा अलीकडेच या भागात ड्रोनच्या साहाय्याने टाकण्यात आला असावा, अशी शंका अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button