काश्मीरचे पुन्हा नंदनवन बनो! – उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray

मुंबई :- भारताच्या सीमेवरचं देखणं वैभव, काश्मीर. वर्षानुवर्षांपासून दहशतवादी लढाया आणि गोळीबारीच्या आवाजानंच दणाणणारं काश्मीर; परंतु याच काश्मिरात हिंदुत्व परत आणण्यासाठी देशाचे नवे गृहमंत्री अमित शहा यांनी पाऊल पुढे टाकत काश्मिरात हिंदू मुख्यमंत्री बनवण्यासाठीचा अजेंडा असल्याचे बोलले आहे; शिवाय काश्मिरात काश्मिरी पंडितांची घरवापसी होण्यासाठी विशेष अजेंडा राबवणार असल्याचेही अमित शहा यांनी म्हटले आहे. जर असे होणार असेल तर खरोखरच हे अमित शहांकडून होणारे मोठे राष्ट्रीय सत्कार्यच असेल, असे मत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ‘सामना’तून व्यक्त केले आहे.

ही बातमी पण वाचा : उद्धव ठाकरे शिवसेना खासदारांसह 15 जून रोजी पुन्हा अयोध्येला जाणार

काश्मिरात हिंदू मुख्यमंत्री व्हावा व काश्मिरी पंडितांची घरवापसी व्हावी हा अमित शहा यांचा अजेंडा असेल तर त्यांनी हाती घेतलेले ‘ऑपरेशन’ हे राष्ट्रीय सत्कार्यच आहे. शहा यांची विचारसरणी लपलेली नाही. ममता बॅनर्जींच्या प. बंगालात घुसून त्यांनी ‘जय श्रीराम’ची गर्जना केली व आता जम्मू- काश्मिरात विधानसभा मतदारसंघांची पुनर्रचना करण्याचा त्यांचा इरादा दिसत आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली फक्त विधानसभा जागांचाच ‘भूगोल’ बदलणार नाही, तर संपूर्ण काश्मीरचा भूगोल बदलला तरी आश्चर्य वाटणार नाही! काश्मीरचे पुन्हा नंदनवन बनो! अशी स्पष्ट भूमिका उद्धव ठाकरे यांनी अग्रलेखातून मांडली आहे.

ही बातमी पण वाचा : उद्धव ठाकरेंची शरद पवारांना साथ; बारामतीचंच काय कोणाचंही पाणी रोखणं चुकीचं – ठाकरे

काश्मीरचा राजा हरिसिंग हिंदू होता; पण स्वातंत्र्यानंतर एकदादेखील जम्मू-काश्मीरचा तेथे हिंदू मुख्यमंत्री झाला नाही. जणू काही हिंदूंच्या हाती सत्ता गेली तर आभाळ कोसळेल. ही मानसिकता बदलण्याचा प्रयत्न कधीच झाला नाही. ते आता होणार असेल तर त्याचे स्वागत व्हायला हवे, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.