लष्कर पाकव्याप्त काश्मीरचे स्वातंत्र्य आंदोलन दडपते आहे

- 'न्यूयॉर्क टाईम्स'चा आरोप

478974-pok

पाकव्याप्त काश्मीरमध्ये स्वातंत्र्यासाठी तीव्र आंदोलन सुरू आहे, पाकिस्तानचे लष्कर हे आंदोलन क्रूरतेने डपण्याचा प्रयत्न करते आहे, अशी माहिती अमेरिकेच्या ‘न्यूयॉर्क टाईम्स’ने दिले आहे. पाकिस्तानने या परिसरातील नागरिकांवर अनेक निर्बंध लादले आहेत. स्वातंत्र्याविषयी चकार शब्दही काढायाच नाही, असा इशारा पाकिस्तानकडून या नागरिकांना देण्यात आला आहे.


वॉशिंग्टन :- पाकव्याप्त काश्मीरमध्ये स्वातंत्र्यासाठी तीव्र आंदोलन सुरू आहे, पाकिस्तानचे लष्कर हे आंदोलन क्रूरतेने डपण्याचा प्रयत्न करते आहे, अशी माहिती अमेरिकेच्या ‘न्यूयॉर्क टाईम्स’ने दिले आहे. पाकिस्तानने या परिसरातील नागरिकांवर अनेक निर्बंध लादले आहेत. स्वातंत्र्याविषयी चकार शब्दही काढायाच नाही, असा इशारा पाकिस्तानकडून या नागरिकांना देण्यात आला आहे.

न्यूयॉर्क टाईम्सच्या पत्रकारांनी पाकव्याप्त काश्मीरचा दौरा केला. लोकांशी संवाद साधला. त्यावेळी पाकव्याप्त काश्मीरमध्ये लष्कराला स्वातंत्र्यासाठी सुरु असलेल्या आंदोलनांचा तीव्र सामना करावा लागत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. दरम्यान, भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव वाढल्यानंतर या भागातील सैन्याचा बंदोबस्त आणखीनच वाढल्याची माहिती स्थानिकांनीं दिली.

भारताने काश्मीरचा विशेष राज्याचा दर्जा काढून घेतल्यानंतर पाकिस्तानमधील दहशतवादी जास्त चेकाळले आहेत. त्यामुळे पाकिस्तान पुन्हा आंतरराष्ट्रीय समुदायाच्या टिकेचा विषय होऊ शकतो अशी भीती लष्करी अधिकाऱ्यांना वाटते आहे.

पाकव्याप्त काश्मीरमध्ये दिवसेंदिवस स्वातंत्र्य चळवळीला मिळणारा पाठिंबा वाढतो आहे. पाकिस्तसाठी ही मोठी डोकेदुखीत ठरते आहे. या भागातील मोबाईल फोन इंटरनेट सेवाही खंडित करण्यात आली आहे.