काश्मीर : सात दहशतवाद्यांचा खात्मा, एकाने केले आत्मसमर्पण

Kashmir-7 terrorists killed, one surrendered

नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमध्ये भारतीय सैन्य दलाने (Indian Army) दहशतवाद्यांच्या विरुद्धच्या कारवाईत सात दहशतवाद्यांचा खात्मा (7 terrorists neutralised) करण्यात आला. २८ ऑगस्ट रोजी दुपारी भारतीय सैन्य दलाने दहशतवाद्यांच्या विरोधात एकूण दोन ठिकाणी कारवाई केली.

सात दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले, एका दहशतवाद्याने आत्मसमर्पण केले. जम्मू-काश्मीर जनरल ऑपरेशन कमांडिग (GOC) ए. सेनगुप्ता यांनी सांगितले की, १८ तासांपेक्षा जास्त चाललेल्या कारवाईत दहशतवाद्यांच्या विरोधात दोन ठिकाणी कारवाई झाली. जम्मू-काश्मीर पोलीस आणि आरआर बटालियन यांनी संयुक्त कारवाई केली.

या कारवाईत एकूण सात दहशतवाद्यांना ठार करण्यात आले आहे तर एका दहशतवाद्याने आत्मसर्मपण केले आहे. या आठ दहशतवाद्यांपैकी सात जण २०२० मध्ये दहशतवादी संघटनेत सहभागी झाले होते. पाकिस्तानी दहशतवादी हँडलर्सने त्यांना दहशतवादी संघटनेत सामील केले होते, अशी माहिती ए. सेनगुप्ता यांनी दिली. दक्षिण काश्मीरचे डीआयजी अतुल गोयल यांनी सांगितले की, ज्या दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे त्यांनी अनेक नागरिकांवर अत्याचार केले आहेत. सैन्य दलावर केलेल्या हल्ल्यातही त्यांचा सहभाग होता.

या वर्षात दक्षिण काश्मीरमध्ये जवळपास ८० जणांची दहशतवादी संघटनेत भरती करण्यात आली होती. बिगेडियर अजय कटोच म्हणाले की, मी सर्व दहशतवाद्यांना आवाहन करू इच्छितो की, त्यांनी आत्मसमर्पण करावे. आत्मसमर्पण करणाऱ्या दहशतवाद्यांना सामान्य जीवन जगण्यासाठी आवश्यकत ती मदत करू. जम्मू-काश्मीरमध्ये भारतीय सैन्य दलाची शोध मोहीम सुरू होती. त्यावेळी दहशतवाद्यांनी भारतीय सैन्यावर हल्ला केला. भारतीय सैन्यानेही गोळीबार सुरू केला. दहशतवाद्यांना ठार मारले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER