कास बहरले पण पर्यटकांची प्रतीक्षा

Flowers

सातारा : जागतिक वारसा स्थळ म्हणून प्रसिध्द असलेल्या सातारा येथील कास पठारावर विविधरंगी फुलांचा नजराणा बहरला आहे. कोरोनामुळे पर्यटकांना बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे कास प्रथमच पर्यटकांविना बहरले आहे. सध्या कास पठारावर रंगीबेरंगी फुलांचा नजराणा पाहावयास मिळत आहे. यंदा प्रथमच कास पठारावर शांतता दिसून येत आहे.

फुलांच्या बहराबरोबर पर्यटनाला बहर येणार असून जिल्ह्यासह देश विदेशातील पर्यटकांची पावले आता कास पठाराच्या दिशेने पडू लागणार आहेत. मात्र त्याला कोरोनामुळे मर्यादा आल्या आहेत. सध्या कास पठारावर गेंध, चवर, डिपाडी, टूथब्रश, पांढरे भुईचक्र, तांबडे भुईचक्र, आषाढ आमरी, पाचगणी आमरी, डोलरी, आयफोनिया, भुसारजंगळी, कंदील पुष्प, वाईतुरा, सातारी तुरा, रानजाई, कुमुदिनी, अभाळी, नभाळी, रान हळद, तुतारी, पाचगणी हंभे आमरी, सीतेची आसवं, जांभळा तेरडा, स्पंद, कावळा, पिवळी सोनकी, नभाळी, निलिमा, अबोलिमा, रानवांग, रानमोहरी अशी 30 ते 40 प्रकारची फुले दिसू लागली आहेत.

त्यामुळे पठारावर विविध फुलांच्या रंगीबेरंगी छटा पाहावयास मिळत आहेत. सध्या कास पठारावर जांभळ्या, गुलाबी, पिवळ्या व पांढऱ्या रंगाची फुले पर्यटकांचे आकर्षण ठरू लागली आहेत. गेल्या सहा सात दिवसापासून मोसमी पावसाने उघडीप दिली असल्याने ऊन पावसाचा खेळ सुरू झाला आहे. त्यामुळे कास पठारावरील नैसर्गिक रंगीबेरंगी फुलांना सजला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER